Dabolim Airport: दाबोळी 'भूत बंगला' होणार; मोपामुळे दक्षिण गोव्यातील पर्यटन संकटात

Goa Assembly Session: गोव्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे, तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशात विरोधी नेते आणि सरकार यांच्यामध्ये प्रश्नउत्तरं सुरु आहेत
LOP Yuri Alemao | Goa Assembly Session 2025
LOP Yuri Alemao | Goa Assembly Session 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअरलाईन्स आपले कामकाज स्थलांतरित करत असल्याने दक्षिण गोव्यातील दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच ‘भूत बंगला’ बनेल, असा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सोमवारी (दि. २४ मार्च) केला.

गोव्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे, तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशात विरोधी नेते आणि सरकार यांच्यामध्ये प्रश्नउत्तरं सुरु आहेत. राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाने दाबोळीहून मोपा विमानतळावर आंतरराष्ट्रीय कामकाज स्थलांतरित करण्याची घोषणा केल्याने टॅक्सी चालक, हॉटेल व्यावसायिक तसेच इतर संबंधित व्यवसाय आणि दक्षिण गोव्यातील लोकांच्या मनात भीती आणि चिंता निर्माण झाली आहे असे आलेमाव म्हणाले.

LOP Yuri Alemao | Goa Assembly Session 2025
Goa Assembly: गोव्याचं काँक्रीट जंगल होतंय, लोकांची टॅंकरवर भिस्त; पाणीटंचाईवरून विरोधकांचा हल्लाबोल

उत्तर गोव्यात मोपा विमानतळ सुरू झाल्यापासून अनेक एअरलाईन्सनी दाबोळीहून त्यांचे कामकाज स्थलांतरित केले आहे आणि यामध्ये सध्या वाढ होतेय असेही त्यांनी नमूद केले.

“५ ऑगस्ट २०२४ पर्यंत, तीन विमान कंपन्यांनी गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपले कामकाज स्थलांतरित केले आहे,” असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले. वारंवार विनंती करूनही, दाबोळीहून मोपाला एअरलाइनचे कामकाज स्थलांतरित होणे थांबवण्यात सरकार अपयशी ठरले आहे आणि परिणामी विमानतळावरील प्रवाशांची संख्या कमी झालीये.

LOP Yuri Alemao | Goa Assembly Session 2025
Goa Assembly: धार्मिक भावना भडकावणाऱ्या घटना घडत आहेत ही दुःखद बाब! म्हापसा 'बीफ' प्रकरणावरती फेरेरांनी वेधले लक्ष

या निर्णयाचा दक्षिण गोव्यातील पर्यटन उद्योगावर मोठा परिणाम होईल आणि मोपा विमानतळाच्या वाढीसाठी दाबोळी विमानतळ बंद केले जाईल, अशी भीती भागधारकांमध्ये आहे,” असे आलेमाव म्हणालेत.

या प्रकरणावर सरकारने त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे. दाबोळी विमानतळाचे महत्त्व लक्षात घेता, सरकारने एअरलाइन कंपन्यांना दाबोळी विमानतळावरून कामकाज स्थलांतरित करण्यापासून रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे. दक्षिण गोव्यातील पर्यटन उद्योगावर होणारा परिणाम टाळण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलणे आवश्यक असल्याचं विरोधी नेते म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com