Petrol-Diesel Price Today : 1 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. देशाची राजधानी दिल्लीसह चारही महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असून देशभरात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढलेल्या नाहीत त्यामुळे अनेक दिवसांच्या पेट्रोल-डिझेलच्या दर वाढीच्या धक्क्यांमुळे हादरलेल्या जनसामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. (Petrol and diesel prices remained unchanged on Friday)
दरम्यान IOCL च्या ताज्या दरांनुसार, दिल्लीत पेट्रोलची किंमत 101.81 रुपये प्रति लिटर आणि डिझेलची किंमत 93.07 रुपये दर आहे. मुंबईत पेट्रोल 116.72 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 100.94 रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये आज एक लिटर पेट्रोल 107.45 रुपयांना तर डिझेल 97.52 असून कोलकातामध्ये (Kolkata) आज पेट्रोलचा दर 111.35 रुपये तर डिझेलचा दर 96.22 रुपये आहे.
विशेष म्हणजे 22 मार्चपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असताना आज पेट्रोल-डिझेलचे दर केवळ दोन दिवस स्थिर राहिले आहेत. खरे तर रशिया आणि युक्रेनमध्ये (russia-ukraine war) सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या. तथापि, त्यानंतर काही वेळा किंमती खाल्या होत्या. परंतू अजूनही उच्च पातळीवर आहेत.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारे देशातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज ठरत असतात. त्याप्रमाणे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत चढ-उतार होत असतो. इंडियन ऑइल (Indian Oil), भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.
महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर
शहराचे नाव पेट्रोल डिझेल
दिल्ली 101.81 93.07
मुंबई 116.72 100.94
चेन्नई 107.45 97.52
कोलकाता 111.35 96.22
तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत असे कळू शकते...
देशाची राजधानी दिल्लीसह चारही महानगरांमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दरात कायम बदल होत असतात. त्यामुळे अनेकांना पंपावर गेल्यावरच पेट्रोल आणि डिझेलची आजच्या किंमतीचा अंदाज येतो. त्यामुळे अनेकांना पेट्रोल भरावे की नको असा प्रश्न पडतो. त्यामुळे येथून पुढे पंपावर जाऊन ताटकळत न बसता, तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज कळू शकतात, तेही सोप्या पद्धतीने. आपल्याला फक्त एक एसएमएस करावा लागेल. इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुमच्या शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी https://iocl.com/petrol-diesel-price या लिंक वर जा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.