मोरजी: विमानतळ प्रकल्प परिसरात जे बिगर गोमंतकीय कामगार आणलेले आहेत, त्या कामगारांनी जीएमआर आणि मेगा व्हाईट या दोन्ही कंपन्यांकडून आपल्याला वेळेवर पगार दिला जात नाही,असा दावा करून आज (शुक्रवारी) 24 तासात जर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत,तर आम्ही आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला. घटनास्थळी पोलिस आणि अधिकारी धावून आले आणि उद्या(शनिवार)पर्यंत समस्या सोडवण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलक शांत झाले.मोपा विमानतळ प्रकल्पासाठी झारखंड, उत्तर प्रदेश मध्य प्रदेश,आसाम,या भागातील किमान पाच हजार मजूर वेगवेगळे काम करत आहेत.
कशा पद्धतीच्या इमारती बांधल्या जातात, इथे कोण कोणते गैरव्यवहार चालतात, याचा कोणालाही थांगपत्ता लागत नाही. केंद्र सरकारच्या पाठबळामुळे राज्य सरकारने कंपनीला पूर्णपणे सुरक्षा दिलेली आहे. त्यामुळे या प्रकल्पात काय चालले आहे, हे स्थानिकांनाच नव्हे तर माध्यम प्रतिनिधींनाही कळत नाही. कारण मुख्य कंपनीच्या गेटवरून कोणाही माध्यम प्रतिनिधींना आत प्रवेश दिला जात नाही. तेथे काम करणाऱ्या कामगारांना निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जाते, अशा तक्रारी कामगारांच्या आहेत. आमचा पगार द्या, म्हणून आज कामगारांनी गेटवर आंदोलन सुरू केले. सरकारने या प्रकल्पाकडे गांभीर्याने लक्ष देऊन दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी या कामगारांनी केली आहे.
‘सुरक्षारक्षक प्रमुखाची हकालपट्टी करा’
पंधरा दिवसांपूर्वी असेच या कामगारांना पगार दिला नव्हता म्हणून कामगारांनी थेट वाहनावर दगडफेक केली होती. शिवाय विमानतळ प्रशासकीय इमारतीवर दगडफेक करताना सुरक्षारक्षक प्रमुख देवेंद्र गाड यांनाही धक्काबुक्की केल्याचा संशय आहे. दरम्यान, सुरक्षारक्षक प्रमुख देवेंद्र गाड यांच्याही विरोधात सुरक्षारक्षकांनी आंदोलन करून त्यांची त्वरित हकालपट्टी करावी, अशी मागणी लावून धरली आहे. संतप्त कामगारांच्या आक्रमक भूमिकेमुळे वाहनांच्या आगीला सुध्दा हेच जबाबदार असावेत,असा संशय व्यक्त केला जात आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.