Fishing in Goa: बास्केट मासेमारी विरुद्ध 'गोएचो रापोणकारांचो एकवोट'चा एल्गार, सरकारकडे केलीय 'ही' मागणी

सदर मासेमारी करणारे स्थलांतरीत समुदायांपैकी असून त्यांच्याकडे नोंदणीकृत उपकरणे नाही
Fishing
Fishing Dainik Gomantak
Published on
Updated on

Fishing in Goa: 'गोएचो रापोणकारांचो एकवोट' ग्रुपने 'वरेग' आयलँड, चिखली जवळ झुआरी नदीवर बेकायदेशीर बास्केट मासेमारीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.

ओलेन्सिओ यांनी सांगितले की ही बेकायदेशीर मासेमारी, मच्छिमार नसलेल्या स्थलांतरित समुदायाद्वारे केली जाते ज्यांच्याकडे नोंदणीकृत मासेमारी उपकरणे नाही.

मत्स्यव्यवसाय विभागाने गोव्यातील नद्यांमध्ये असे सर्व मासेमारी उपकरणे किंवा उपकरणे जप्त करण्याची मागणी 'गोएचो रापोणकरांचाे एकवट'ने केली आहे.

Fishing
Anjuna Robbery Case: कर्नाटकचे कपल गेले बीचवर फिरायला; इकडे सुरक्षा रक्षकाने साधला डाव, वाचा काय आहे प्रकरण..

सध्या राज्यात 61 दिवसांचा मासेमारी बंदी काळ चालू आहे. मात्र या बंदी काळात अजूनही खोल समुद्रात मासेमारी चालू असल्याचे गोयचो रापोणकारांचो एकवोटच्या सदस्यांनी गेल्या आठवड्यात वेलसाव समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाच्या नजरेस आणून दिले होते.

तसेच या बेकायदेशीर मासेमारीवर बंदी आणावी अशी मागणी केली होती. दरम्यान चिखली ते सांकवाळ या खाडीत चिखली झुआरी नदीवर वरेग आयलॅंडवर परप्रांतियांकडून जे मच्छिमार नाही अशा कडून बेकायदेशीर बास्केट मासेमारी चालू असल्याचे गोएचो रापोणकरांचो एकवोटचे सचिव ओलेन्सियो सिमोईश यांनी गोवा राज्याच्या मच्छिमारी विभागाच्या नजरेस आणून दिले आहे.

Fishing
Vijay Sardesai: वेस्टर्न बायपास स्टिल्टसह 'या' विषयांवर विजय सरदेसाईंनी घेतली गडकरींची भेट

सदर मासेमारी करणारे स्थलांतरीत समुदायांपैकी असून त्यांच्याकडे नोंदणीकृत उपकरणे नाही. ते लोक पाण्यात बास्केट सोडून त्यातून खोल पाण्यात जाऊन जाळ्यातून मासेमारी करतात जे बेकायदेशीर आहे.

अशा लोकांवर त्वरीत कारवाई करून मत्सव्यवसाय विभागाने गोव्यातील नद्यांमध्ये असे सर्व मासेमारी उपकरण जप्त करण्याची मागणी गोएचो रापोणकरांचो एकवोट ने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com