Goa Monsoon: ..मात्र गोव्यात 'पाऊस' पडण्याची शक्यता; देशभरातून मान्सूनची माघार; गेल्या २४ तासांत वाळपईत सर्वाधिक

Goa Rain: गोवा वेधशाळेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, १२४ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा करण्यात आली. जुलै महिन्यात तब्बल ७९.२५ इंच पावसाची नोंद केली, जी आतापर्यंतच्या जुलैमधील सर्वाधिक पावसाची नोंद आहे.

Goa WeatherDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यंदा ४ जून रोजी दाखल झालेल्या नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण देशभरातून आज (१५ ऑक्टोबर) माघार घेतली. राज्यात यंदा मॉन्सून कालावधीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने नवा विक्रम प्रस्थापित केला.

गोवा वेधशाळेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, १२४ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा करण्यात आली. जुलै महिन्यात तब्बल ७९.२५ इंच पावसाची नोंद केली, जी आतापर्यंतच्या जुलैमधील सर्वाधिक पावसाची नोंद आहे.

राज्यात ४ जून ते ३० सप्टेंबरपर्यंत एकूण ४,४००.७ मिमी म्हणजेच १७३.२५ इंच पावसाची नोंद केली होती. तर मॉन्सूनोत्तर कालावधीला सुरवात झाल्यापासून १ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाने माघार घेईपर्यंत एकूण १५१.१ मिमी म्हणजेच ५.९४ इंच पावसाची नोंद झाली.

Goa Rain: गोवा वेधशाळेच्या उपलब्ध आकडेवारीनुसार, १२४ वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद यंदा करण्यात आली. जुलै महिन्यात तब्बल ७९.२५ इंच पावसाची नोंद केली, जी आतापर्यंतच्या जुलैमधील सर्वाधिक पावसाची नोंद आहे.
Goa Monsoon 2024: ऑक्टोबरच्या पहिल्या दिवशीच गोव्यात 'यलो अलर्ट'; हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

नहुष कुलकर्णी, संचालक, गोवा वेधशाळा.

नैऋत्य मोसमी वाऱ्याने देशभरातून माघार घेतली असली, तरी उत्तर-पूर्व मॉन्सूनचे अप्रत्यक्ष परिणाम गोव्यातील वातावरणावर दिसून येतील. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल.

वाळपईत सर्वाधिक पाऊस!

राज्यात गेल्या २४ तासांत वाळपईत सर्वाधिक ६१.२ मि.मी. पावसाची नोंद. तर म्हापसा १४.२ मि.मी., पेडणे ८.५ मि.मी., फोंडा २४.० मि.मी., पणजी ६.० मि.मी., जुने गोवा ७.० मि.मी., साखळी १५.४ मि.मी., काणकोण २५.४ मि.मी., दाबोळी ४२.४ मि.मी., मडगाव १७.४ मि.मी., मुरगाव २९.८ मि.मी., केपे ३८.३ मि.मी., व सांगेत ३२.० मि.मी., पाऊस.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com