School
School Dainik Gomantak

Heat Wave in Goa: शाळांना सुटी द्या किंवा लवकर सोडा!

राजकीय पक्ष, पालकांचे मुख्यमंत्र्यांसह शिक्षण संचालकांना पत्र
Published on

Heat Wave in Goa: राज्यात मॉन्सून लांबला असून तापमानात झालेली वाढ, आर्द्रतेत झालेला बदल यांमुळे नागरिकांसह विद्यार्थीही हैराण झाले आहेत.

या पार्श्‍वभूमीवर प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा काही दिवसांसाठी बंद ठेवाव्यात किंवा लवकर सोडाव्यात, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.

यासाठी विविध संघटना, राजकीय पक्ष आणि बिगर शासकीय संघटनांनी मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांना निवेदन सादर केले आहे.

School
Goa Monsoon Update: राज्यात मॉन्सूनचे 13 जूनला आगमन

‘आप’च्या नेत्या सिसिल रॉड्रिग्स यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांच्याकडे शाळा काही दिवस बंद कराव्यात किंवा वर्गाचे तास कमी करून लवकर सोडाव्यात, अशी मागणी केली आहे.

यावेळी रॉड्रिग्स म्हणाल्या की, उष्णतेमुळे विद्यार्थ्यांना बराच त्रास सहन करावा लागत आहे. त्यांच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने वर्गातील पंखे बंद राहतात. त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांकडून येत आहेत.

अनेक शाळांमध्ये पंखे नीट चालत नाहीत. काही ठिकाणी ते बंदच आहेत. या सर्व गोष्टी लक्षात घेता, आम्ही शाळा लवकर सोडाव्यात, अशी मागणी शिक्षण संचालकांकडे केली आहे. तर काही शाळा सकाळी १०.३० वाजताच विद्यार्थ्यांना सोडत आहेत.

School
GCA Secretary Rohan Desai: 'बीसीसीआय'च्या दक्षिण विभाग निमंत्रकपदी गोवा क्रिकेट असोसिएशनचे रोहन देसाई बिनविरोध

त्यामुळे त्या शाळांना वर्गाचे तास कमी करण्याची आवश्‍यकता नाही. तरीही सरकार जो निर्णय घेईल, त्याची खात्याकडून अंमलबजावणी केली जाईल, असे शैलेश झिंगडे म्हणाले.

पालकांच्या वतीने आम्ही आज शिक्षण संचालकांना निवेदन सादर केले. यावर्षी जरा जास्तच उकाडा जाणवत आहे. एव्हाना पाऊस पडायला हवा होता. पण त्याला विलंब होत आहे. आमची मुले उष्म्यामुळे हैराण होऊन शाळांतून घरी परतात.

घरी आल्यावर त्यांना एवढा थकवा आलेला असतो की त्यांना झोपून राहावे असं वाटतं. या गोष्टी लक्षात घेता, सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात.

- श्वेतलाना डिसोझा, पालक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com