पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून, दोन आठवडे चालण्याची शक्यता

जुनेच कंत्राटदार कायम
Goa Monsoon Convention
Goa Monsoon Convention Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : आठव्या गोवा विधानसभेच्या पहिले पावसाळी अधिवेशन 11 जुलैपासून दोन आठवड्यांसाठी घेण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. आठवी विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर नव्या वर्षाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी घेणे क्रमप्राप्त होते. याशिवाय दोन अधिवेशने सहा महिन्यांच्या आत घेणे गरजेचे असल्याने 29 व 30 मार्च रोजी अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन यावर्षातील पहिलेच अधिवेशन असल्याने राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांचे 29 मार्चला अभिभाषण झाले होते. (Monsoon convention in Goa from 11th July)

Goa Monsoon Convention
मारहाणप्रकरणी गोवा मेडिकल कॉलेजच्या चार विद्यार्थ्यांची हकालपट्टी

या अधिवेशनावरचा अभिनंदनाचा ठराव अधिवेशन दोन दिवसांचे असल्याने घेणे बाकी होता. त्याच दोन दिवसांच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री या नात्याने 30 मार्चला 2022-23 चा अर्थसंकल्पही मांडला होता. या अर्थसंकल्पावरही वेळेअभावी सविस्तर चर्चा झाली नाही. याशिवाय नव्या सरकारपुढे अनेक ठराव, अधिसूचना, कायदेदुरुस्ती आणि आमदारांचे प्रश्न असे दीर्घ कामकाज असल्याने हे नवे अधिवेशन दोन दिवसांचे घेणे औपचारिक ठरले आहे. या अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा होईल. मुख्यमंत्र्यांनी मांडलेल्या 2022-23 च्या अर्थसंकल्पावरही सविस्तर चर्चा होणार आहे.

जुनेच कंत्राटदार कायम

यंदाच्या सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन 11 जुलैला घेण्यात येणार असल्याचा निर्णय झाल्यानंतर, मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध विषयांवर निर्णय घेण्यात आले. आग्वाद किल्ला स्मारकाच्या देखभालीचे कंत्राट एक वर्षासाठी जुन्या आहे त्याच कंपनीला देण्याचा निर्णय घेण्यात आला. वीज खात्यातील आयटी कामाचे कंत्राट पुन्हा जुन्या कंपनीलाच एक वर्षांसाठी देण्यात आले. स्कील इंडिया विभागासाठी नव्या 52 पदांची निर्मिती केली असून, ही पदे भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या इंडिस्कोपी विभागासाठी तज्ज्ञ डॉक्टर म्हणून अमित मायदेव यांना घेण्यात येणार आहे. त्याला मंजुरी मिळाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com