Monsoon 2025
Monsoon 2025Dainik Gomantak

Monsoon 2025: राज्यभरात पावसाची शक्यता! हवामान विभागाकडून मच्छीमारांना सतर्क राहण्याचा सल्ला

Goa Rain Alert: आजपासून तीन दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
Published on

पणजी: आजपासून तीन दिवसांत राज्यातील काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान विभागाने गुरुवारी पावसाची शक्यता वर्तविली होती.

त्यानुसार काणकोण, सांगे, केपे, सत्तरी, डिचोली तालुक्यांतील काही भागांत गडगडाटासह सरी कोसळल्या. त्यामुळे उष्मा कमी होऊन गारवा जाणवू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला.

Monsoon 2025
Goa Travel Guide: गर्लफ्रेन्ड, बायको किंवा मित्रांसोबत गोवा फिरायचाय? कुठं फिराल, काय खायचं - प्यायचं, खर्च किती येईल? वाचा एका क्लिकवर

हवामान खात्याने आगामी तीन दिवस (ता. १६ ते १८ मे) पाऊस पडण्याचा इशारा देतानाच नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन केले आहे.

Monsoon 2025
4G Tower In Goa: गोव्यात मोबाईल नेटवर्क होणार आणखी स्ट्राँग; IT विभाग 66 ठिकाणी उभारणार 4G टॉवर

गेल्या दोन-तीन दिवसांपासून रात्री ढग दाटून येत असून, मध्यरात्री किंवा पहाटे पाऊस पडत आहे. पुढील तीन दिवस राज्यात आकाश ढगाळ राहणार असून, काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, असे हवामान खात्याने सूचित केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com