Mollem: मोले चेकनाक्यावरील कामगार 3 महिने वेतनाविना, गेट ठेवल्या खुल्या; माहिती मिळताच कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांची शिष्टाई

Mollem check post workers: मोले येथील चेकनाक्यावर नवीनच बसविलेल्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगसाठीच्या स्कॅनरवरील कामगारांना गेले ३ महिने पगारच नसल्याने कामगारांत नाराजी पसरली आहे.
Mollem
MollemDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मोले येथील चेकनाक्यावर नवीनच बसविलेल्या कागदपत्रांच्या स्कॅनिंगसाठीच्या स्कॅनरवरील कामगारांना गेले ३ महिने पगारच नसल्याने कामगारांत नाराजी पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मोले या नाक्यावर स्थानिक कामगार काम करीत आहे. मुलाखती घेऊन त्यांना कामावर घेतलेले आहे. तीन महिने उलटून गेले तरी अद्याप त्यांना नियुक्तीपत्रे दिलेली नाहीत, तसेच त्यांचा ३ महिन्यांचा पगारही दिलेला नाही.

Mollem
Goa Cabinet Decision: मुख्य अभियंत्यासाठी वयाची अट शिथिल, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग, ईपीएफ परतावा, वाचा गोवा कॅबिनेटचे तीन मोठे निर्णय?

या संदर्भात धारबांदोडा तालुक्यात फेरफटका व जिल्हा पंचायत निवडणूक संदर्भात शहनिशा करण्याकरीता आलेले कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना चेकनाक्यावरील कामगारांना पगार दिला नसल्याचे समजले.

तेव्हा त्यांनी कंत्राटदार मुन्ना यादव यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली, आणि त्यांना ३ महिने पगार का दिला नाही, अशी विचारणा केली. तेव्हा मुन्ना यादव यांनी २० रोजी त्यांना पगार व नियुक्ती पत्रे देणार असल्याचे सांगितले.

Mollem
Goa vs Assam: 4,6,6,4,4! सनथ-जीवनची तुफानी खेळी; गोव्याचा आसामवर दणदणीत विजय

२० रोजी वेतन देण्याचे आश्‍वासन

तीन महिने पगार दिला नसल्याने येथील कामगारांनी सकाळी ९ वा. काम थांबवून चेकनाक्यावरील गेट उघड्याच ठेवल्या.जेव्हा वरिष्ठापर्यंत ही बाब पोहचली, त्यामुळे कंत्राटदारांनी या कामगारांशी दूरध्वनीवर चर्चा केली व २० रोजी पगार देण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com