New IPO: 200 कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट; गोव्यातील 'मोलबायो डायगनोस्टीक' कंपनीचा लवकरच येणार आयपीओ

Molbio Diagnostics IPO: मोलबायो डायगनोस्टीक कंपनी १.६ बिलियन डॉलर Valuation सह युनिकॉर्न क्लबमध्ये दाखल झाली आहे.
Molbio Diagnostics IPO
Upcoming IPO's in Share MarketDainik Gomantak
Published on
Updated on

Molbio Diagnostics IPO

पणजी: गोव्यातील मोलबायो डायगनोस्टीक लि. कंपनीचा आयपीओ लवकरच बाजारात येणार आहे. कंपनीने यासाठी सेबीकडे प्रस्ताव पाठवला असून, या आयपीओच्या माध्यमातून कंपनीने २०० कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मोलबायो १.२५ कोटी पेक्षा अधिक शेअरच्या माध्यमातून हा आयपीओ बाजारात घेऊन येत आहे. कंपनीच्या विस्तारासाठी हा आयपीओ बाजारात आणला जात आहे.

मोलबायो डायगनोस्टीक कंपनीचे भारतात पाच उत्पादन प्लांट आहेत. नव्यानं उभारण्यात येणाऱ्या रक्कमेतून कंपनी विस्तार करु पाहत आहे. कंपनी १.६ बिलियन डॉलर Valuation सह युनिकॉर्न क्लबमध्ये दाखल झाली आहे. टेमासेक आणि मोतिलाल ओस्वाल यासारख्या गुंतवणुकदारांकडून कंपनीने ८५ मिलियन डॉलर गुंतवणूक उभारली आहे.

Molbio Diagnostics IPO
तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

गोवा आणि विशाखापट्टनम येथे मोलबायो दोन उत्पादन प्लांट उभारणार आहे. याठिकाणी कंपनी ९९.३ कोटी रुपये संशोधन आणि विकास क्षेत्रात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी खर्च करणार आहे. याशिवाय प्लांट खरेदी, मशीन्स आणि इतर साहित्य खेरदीसाठी ७३.५ कोटी रुपये खर्च करणार आहे.

मोलबायो ३० रोगांवर निदानासाठी आवश्यक असणारे चाचणी किट तयार करते. यामध्ये कर्करोग, कोविड – १९, एचआयव्ही, एचपीव्ही, हिपॅटायटीस बी आणि सी यासारख्या चाचणी किटचा समावेश आहे. गोवा, विशाखापट्टनम आणि बंगळुरु येथील उत्पादन प्लांटमध्ये यांचे उत्पादन केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com