Panaji Rotary Club : मनापासून अभ्यास करा, यश नक्की मिळेल

मोहिंदर अमरनाथ : पणजी रोटरीतर्फे 500 पिंक सायकल्सचे वितरण
Panaji Rotary Club
Panaji Rotary ClubGomantak Digital Team
Published on
Updated on

Panaji Rotary Club : मला ज्यावेळी पहिल्यांदा सायकल मिळाली होती त्यावेळी मी अतिशय आनंदी झालो होतो. मी जरी शिक्षणात चांगला नसलो तरी क्रीडा क्षेत्रात चांगला असल्याने यश प्राप्त झाले. जर तुम्ही मनापासून अभ्यास केला तर तुम्हालाही नक्की यश प्राप्त होईल, असे प्रतिपादन माजी भारतीय क्रिकेटपटू मोहिंदर अमरनाथ यांनी केले.

ते शुक्रवार,19 रोजी रोटरी क्लब पणजीद्वारे 500 पिंक सायकल्स वितरण समारंभात प्रमुख अतिथी या नात्याने बोलत होते. यावेळी रोटरी क्लबचे व्यकंटेश देशपांडे, मनोज काकुलो, सावियो मोंतेरो, आजित मित्तल व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील 25 माध्यमिक विद्यालयांच्या 500 विद्यार्थींनींना या पिंक सायकल्सचे वितरण करण्यात आले.

Panaji Rotary Club
मासे खाणाऱ्यांना होऊ शकतो 'स्कीन कॅन्सर'? धक्कादायक माहिती समोर

या विद्यालयांची झाली निवड

डॉ. के. बी. हेगडेवार हायस्कूल वाळपई, डॉ. के.बी. हेगडेवार हायस्कूल कुर्टी, एल.डी. सामंत हायस्कूल पर्वरी, एम.आय.बी.के. हायस्कूल खांडेपार, मांद्रे हायस्कूल, पार्से हायस्कूल, पीटर आल्वारिस मेमोरियल हायस्कूल मोरजी, एस.ई.एस. हायस्कूल कुडचडे, शारदा इंग्लिश हायस्कूल माशेल, शिक्षा सदन प्रियोळ, श्री भगवती हायस्कूल पेडणे, श्री दुर्गा इंग्लिश स्कूल पार्से, श्री दामोदर विद्यालय लोलये, श्री दयानंद आर्य हायस्कूल नेवरा,

Panaji Rotary Club
Kerala Story Vs Fast And Furious : हा चित्रपट रोखू शकेल का केरळ स्टोरीची बॉक्स ऑफिसवरची घोडदौड...

श्री श्रद्धानंद विद्यालय पैंगीण, श्री वसंत विद्यालय शिवोली, सेंट एलॉयसीस हायस्कूल दिवाडी, सेंट फ्रांसिस झेवियर हायस्कूल शिवोली, सेंट जोसेफ हायस्कूल पेडणे, सुरश्री केसरबाई केरकर विद्यालय केरी, स्वस्तिक प्रियोळ, युनियन, चिंबल, विकास हायस्कूल चिंबल, विकास हायस्कूल वळपेसह इतर विद्यालयांच्या विद्यार्थिनींना या सायकल्स देण्यात आल्या. आर्थिक स्थिती,विद्यार्थिनींच्या घरापासून शाळेचे अंतर हे निकष यासाठी ठरविण्यात आले होते.

Panaji Rotary Club
New Education Policy: नव्या शिक्षण धोरणाची रूपरेषा पुढील आठवड्यात! यंदापासूनच अंमलबजावणी

फुगे सोडून आनंद व्यक्त

रोटरी सदस्य तसेच उपस्थित मान्यवरांद्वारे गुलाबी रंगाचे फुगे आकाशात सोडून आनंद व्यक्त करण्यात आला. विद्यार्थीनींद्वारे यावेळी सायकलच्या बेल वाजविल्याने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

आज ज्या विद्यार्थीनींना सायकल्सचे वितरण करण्यात आले आहे. त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा क्षण आहे. मला खात्री आहे या विद्यार्थीनी एक दिवस निश्‍चितपणे यशाच्या शिखरावर असतील आणि त्यासाठी आजचा उपक्रम एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

व्यंकटेश देशपांडे, रोटरी क्लब

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com