TMC मध्ये गेलेल्यांनी पुन्हा घरवापसी करावी: मोहिद्दीन शेख

मोहिद्दीन शेख यांची काँग्रेसवापसी: मतविभागणी टाळण्यासाठी निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण
Goa TMC
Goa TMCDainik Gomantak

पणजी: मुरगाव येथील माजी मंत्री शेख हसन हरून यांचे पुत्र मोहिद्दीन शेख ऊर्फ आरिफ यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तृमणूल काँग्रेसचा राजीनामा देवून त्यांनी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ‘मतांचे विभाजन होऊ देवू नका. काँग्रेस सोडून जे कोणी तृणमूल काँग्रेसमध्ये (Goa TMC) गेले आहेत त्यांनी पुन्हा घरवापसी करावी’, असे आवाहन त्यांनी केले. (Mohiddin Sheikh appeals to those who joined TMC to return to Congress)

Goa TMC
Goa BJP: कोविड गैरव्यवस्थापनाबाबत काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

पणजीत काँग्रेस (Goa Congress) कार्यालयात झालेल्या कार्यक्रमावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मुरगावचे उमेदवार संकल्प आमोणकर, आल्तिनो गोम्स, शेख हसन, शरद चोपडेकर, नजीर खान, हिमांशू तिवरेकर आदी उपस्थित होते. मोहिद्दीन हसन शेख यांच्यासह साकिब शेख, मसूद शेख, अमन शेख, इश्फाक मुन्शी यांनीही काँग्रेस प्रवेश केला.

मी तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. कारण मला तो पक्षसुद्धा काँग्रेससारखाच आहे असे वाटले होते, पण तेथील वातावरण वेगळे होते. त्यामुळे मी राजीनामा देऊन पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

Goa TMC
उत्पल पर्रीकर निवडून आल्यानंतर भाजपमध्ये जाणार नाही याची गॅरंटी काय?

मी इतर नेत्यांना काँग्रेसमध्ये परत येण्याचे आवाहन करतो. सर्व मतभेद बाजूला ठेवून मुरगाव मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचे मोहिद्दीन शेख म्हणाले.

निवडणूक (Assembly Election) लढवावी म्हणून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झालो होतो. गेले चार महिने मी लोकांना भेटून निवडणूक लढवणार असल्याचे सांगितले होते. मात्र, राज्यात पुन्हा भाजपला सत्ता मिळू नये म्हणून सर्व विरोधक प्रयत्नात असताना मी तृणमूलमधून निवडणूक लढवली तर मतांचे विभाजन झाले असते म्हणून मी पुन्हा काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला. मतांचे विभाजन झालेले मला नको होते आणि म्हणून मी माझ्या कुटुंबीयांशी आणि समर्थकांशी चर्चा केली आणि हा निर्णय घेतला. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी काम करेन, असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com