Xeldem Sarpanch : शेल्डे पंचायतीच्या सरपंचपदी कविता गावस देसाई यांची बिनविरोध निवड

दीप्ती नाईक यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याने हे पद रिक्त झाले होते
Xeldem Sarpanch Kavita Gavas Desai And Minister Nilesh Cabral
Xeldem Sarpanch Kavita Gavas Desai And Minister Nilesh CabralDainik Gomantak
Published on
Updated on

Xeldem Sarpanch : शेल्डे पंचायतीच्या सरपंचपदी कविता गावस देसाई यांची बिनविरोध निवड झाली असून दीप्ती नाईक यांच्यावर अविश्वास ठराव संमत झाल्याने हे पद रिक्त झाले होते.

शेल्डे पंचायतीच्या सरपंचपदी दीप्ती नाईक यांनी फक्त आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण केला होता. पण अचानक आठ पंच सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करून त्यांना पदावरून खाली खेचले होते.

Xeldem Sarpanch Kavita Gavas Desai And Minister Nilesh Cabral
Churchill Alemao: सार्दिन हे एक नंबरचे खोटारडे; मी प्रामाणिक राजकारणी, शंका असेल तर बँक बॅलन्स तपासा...

दीप्ती नाईक यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांनीच प्रथम पसंती देऊन सरपंचपदी विराजमान केले होते. तिळामळ नवीमड्डी येथील रहिवासी प्रकल्पावरून उठलेल्या वादळात दीप्ती नाईक यांना आपले हे पद गमवावे लागले होते.

सदर प्रकल्प जॉनन फेर्नांडिस यांचा असून नाईक यांनी सदर प्रकल्पाचे काम बंद करण्याचे आदेश दिल्याने काही पंच सदस्य नाईक यांच्यावर नाराज झाले होते.

Xeldem Sarpanch Kavita Gavas Desai And Minister Nilesh Cabral
Water Shortage: हरमलमध्ये पाण्याची पातळी खालावली, शेतकरी संकटात

शेल्डे पंचायतीच्या सरपंचपदी कविता गावस देसाई यांची बिनविरोध निवड झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री काब्राल यांनी कविता गावस देसाई यांचे अभिनंदन करून पंचायत क्षेत्रातील कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले तसेच सदर पंचायत घर अपुरे पडत असल्याने नवीन पंचायत घर बांधण्यासाठी आपला प्रयत्न असून सर्व पंच सदस्यांचे सहकार्य या कामाला मिळाले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

यावेळी कविता गावस देसाई यांनी पंचायतीच्या विकास कामांसाठी आमदारांचे सहकार्य आम्हाला मिळेल व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सर्व पंच सदस्यांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com