Goa: लोबो पती-पत्नीचे शिवोलीत स्वागतच : विनोद पालयेंकर

निवडणुका लढविण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे त्यामुळे तसा तो मायकल लोबो (Michael Lobo) आणी त्यांच्या पत्नी दिलायला लोबो यांनाही आहे.
Vinod Palyenkar
Vinod PalyenkarDainik Gomantak
Published on
Updated on

निवडणुका लढविण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाला आहे त्यामुळे तसा तो मायकल लोबो (Michael Lobo) आणी त्यांच्या पत्नी दिलायला लोबो यांनाही आहे. येत्या विधानसभेची निवडणूक जर लोबो पती- पत्नींना शिवोलीतून लढवायची असेल तर त्यांचे येथे स्वागतच आहे.

स्वाभिमानी शिवोलकरांचा पाठींबा  मात्र आपल्यालाच  असल्याचे शिवोलीचे आमदार तथा माजी जलसंपदा मंत्री विनोद दत्ताराम पालयेंकर (Minister Vinod Dattaram Palayenkar) यांनी छातीठोकपणे सांगितले. दांडा- शिवोली येथील त्यांच्या निवासस्थानी स्थानिक पत्रकारांनी त्यांच्याशी पुढील निवडणुकीसंदर्भात त्यांच्या तयारीसंदर्भात  विचारणा केली असतां त्यांनी वरील उत्तर दिले. दरम्यान, मी माझ्या  शिवोली मतदारसंघात आतापर्यंत भरघोस विकास कामे केलेली आहेत त्यामुळे स्थानिक जनता आपल्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे त्यांनी सांगितले. 

Vinod Palyenkar
Goa: पर्यटन क्षेत्राला लवकरच चालना; केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक

मागच्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही आपण गोवा फॉर्वॉर्ड पक्ष ज्या पक्षाशी  युती करेल त्या पक्षाचा अर्थातच युतीचा उमेदवार म्हणुनच आपण निवडणूक लढविणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.  दरम्यान, मागच्या निवडणुकीत आपण राजकारणात नवखा होतो आता मात्र राजकारणातील खाच खळगे तसेच डावपेच शिकलो असल्याचा दावा करतांनाच आपल्या पाठीशी आपल्या दिवंगत भाऊ उदय पालयेंकर यांची पुण्याई असल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

Vinod Palyenkar
Goa: जनतेच्या सेवेसाठी आम्ही निवडून आलो- विल्यिम फर्नांडीस

दरम्यान, आपण आपल्या गोवा फॉरवॉर्ड पक्षाशी प्रमाणीक असून पक्षाचे  सर्वेसर्वा विजय सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला सामान्य माणूस आहे,  मला आतापर्यंत कुणाही अन्य पक्षाकडून कुठलीही ऑफर आलेली नसून त्या केवळ अफवाच असल्याचे पालयेंकर यांनी सांगितले. शिवोलीतील रस्त्यांचे येत्या ऑकँटोबर ते  नोव्हेंबर पर्यत नव्याने डांबरीकरण करण्यात येणार असल्याने उर्वरित विकास कामांचाही झपाटा लावला जाणार आहे त्यामुळे यापुढे कुणाच्याही तक्रारींना जागा राहाणार नसल्याचे पालयेंकर यांनी  निक्षून सांगितले तथापि, शिवोलीतून युतीची उमेदवारी मिळविण्यासाठी  अनेकजण आतापासूनच गुढघ्याला बाशींग बांधून तयारीत आहेत मात्र येत्या विधानसभा निवडणुकीत युतीची उमेदवारी ही हक्काने आपल्यालाच मिळणार असल्याचे विनोद पालयेंकर यांनी शेवटी निक्षून सांगितले.....

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com