Goa Murder Case: मोबोर खून प्रकरण: तिघे गजाआड पण खुनासाठी वापरलेलं 'ते' हत्यार कुठे? आठवडा उलटला तरी कोलवा पोलिसांसमोर मोठे आव्हान!

Mobor Murder Case: खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार अद्याप जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.
Mobor Murder Case
Goa Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मोबोर येथे शशी लाक्रा (२७) यांच्या खूनप्रकरणी कोलवा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली असली, तरी खुनासाठी वापरण्यात आलेले हत्यार अद्याप जप्त करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. घटनेला आठवडाभर उलटून गेला असून, अटकेत असलेल्या संशयितांकडून हत्याराबाबत माहिती मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

मृत शशी लाक्रा यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला आहे. मयताच्या भावाने मृतदेह स्वीकारला. शवविच्छेदन अहवालानुसार, लाक्रा यांच्या गळ्यावर दोन खोल जखमा आढळून आल्या असून, तीक्ष्ण शस्त्राने वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Mobor Murder Case
Goa Crime: मालकाचाच गेम केला? खारीवाड्याच्या बोटमालकाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, कामगारांवर संशय

पोलिस तपासानुसार, गत २३ मे रोजी रात्री दारूच्या नशेत जेवणाच्या ताटाला लाथ मारल्याच्या किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि त्यातून लाक्रा यांचा खून करण्यात आला.

मृतदेह हलविला

पोलिस तपासात आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. लाक्रा यांचा मृत्यू झाल्याची खात्री झाल्यानंतर संशयितांनी त्यांचा मृतदेह ट्रॉलवरून खाली उतरवून काही अंतरावर नेऊन ठेवला होता. पोलिस विदेश शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com