Goa: बेघर महिला-पुरुषांना ‘स्ट्रीट पॉव्हिडन्स’ संस्था ठरतेय हक्काचा निवारा

Goa: ‘स्ट्रीट पॉव्हिडन्स’ या संस्थेचे गोव्यात आठ निवारा गृह असून तिथे बेघर महिला-पुरुषांना आश्रय दिला जातो.
 Homeless Shelter
Homeless ShelterDainik Gomantak
Published on
Updated on

Goa: ‘स्ट्रीट पॉव्हिडन्स’ या संस्थेचे गोव्यात आठ निवारा गृह असून तिथे बेघर महिला-पुरुषांना आश्रय दिला जातो. यापैकी चार पीडित महिलांसाठी व इतर चार हे रस्त्यावरील पुरुषांना आश्रय देतात. यातील बहुसंख्य रहिवासी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत. ही संस्था अशा लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी प्रयत्न करते.

सध्या या संस्थेतील हे आश्रित सध्या स्वच्छता दूत बनले आहेत. स्ट्रीट पॉव्हिडन्सच्या अस्नोडा येथील निवारा गृहामधील या सदस्यांनी थिवी-शिरसई येथील रस्त्यावरील ब्लॅक स्पॉटवरील सर्व तऱ्हेचा कचरा गोळा करीत या मार्गाची साफसफाई केली.

मुळात आपले घर, आपला परिसर, आपले राज्य, आपला देश स्वच्छ-सुंदर राहिला पाहिजे, असे प्रत्येकाला ज्या दिवशी मनापासून वाटेल तेव्हाच बदल होईल आणि सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचे सार्थक होईल. मात्र, आजही लोक घाण करणे, कुठेही कचरा फेकणे, मनात येईल तिथे थुंकणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे वागतात. अशातच, थिवी-शिरसई हा रस्ता लोकांसाठी कचरा टाकण्याचे एक केंद्र बनले आहे.

मोठ्या प्रमाणावर कचऱ्याची उचल

थिवी-शिरसई मार्गावरून ये-जा करणारे लोक बेजबाबदारपणे प्लास्टिक पिशव्यांमधून कचरा इथे फेकतात. याच परिसरात स्ट्रीट पॉव्हिडन्सचे निवारा गृह आहे. या निवारा गृहातील आश्रितांकडून या रस्त्यावरील जवळपास चाळीसपेक्षा जास्त मोठ्या प्लास्टिकच्या पिशव्या भरून कचरा गोळा केला.

 Homeless Shelter
Goa Fishing: ..म्हणून सरकारने अंजुणे, आमठाणे जलाशयांत सोडली मत्स्यबिजे

हे आमचे स्वच्छतेचे कार्य!

  • स्ट्रीट पॉव्हिडन्सचे प्रतिनिधी डोनाल्ड फर्नांडिस म्हणाले की, कचरा साफ करण्यासाठी आम्ही पाऊल उचलले असून आमच्या निवारा गृहातील सदस्यांकडून हा कचरा गोळा करून पिशव्यांमध्ये भरून ठेवला आहे. आता हा कचरा प्रशासनाने उचलून न्यावा. कारण, आम्ही तो कुठेही नेऊन टाकू शकत नाही.

  • सरकारने परवानगी किंवा वाहन उपलब्ध करून दिल्यास आमची तशी तयारी आहे. आमचे गोव्यात एकूण आठ निवारा गृह असून आम्ही सर्वांना आपल्या तीन किलोमीटरमधील रेडिएसमधील असे ब्लॅक स्पॉट आठवड्यातून किमान दोनवेळा साफ करण्यास सांगितले आहे.

  • आमच्या गृहात हे आश्रित सदस्य अधिकतर रहिवासी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग आहेत. त्यांनाही अ‍ॅक्टिव्हिटी मिळावी या हेतूने ही स्वच्छता करण्याचे आम्ही ठरविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com