Varca Tower Protest: 'आमकां मोबाईल टॉवर नका' अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; वार्कात स्थानिक संतप्त

Mobile Tower at Varca: वार्का येथे उभारलेल्या मोबाईल टॉवर्समुळे आरोग्याची संभाव्य भीती निर्माण होतेय असं म्हणत स्थानिक याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत
mobile tower protest goa
mobile tower protest goaDainik Gomantak
Published on
Updated on

दक्षिण गोवा: वार्का येथे उभारलेल्या मोबाईल टॉवर्समुळे आरोग्याची संभाव्य भीती निर्माण होतेय असं म्हणत स्थानिक याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत. वार्का या भागात अलीकडेच मोबाईल टॉवर्स बसवले गेलेत आणि यामुळे स्थानिक हतबल झाले आहेत आणि हे टॉवर्स त्वरित हलवावे अशी मागणी करत आहेत.

स्थानिकांना हे टॉवर्स नकोयत आणि म्हणून ते टॉवर्स हलवावे अशी मागणी करतायत तसेच याबद्दल अनेक तक्रारी देखील संबंधित अधिकाऱ्यांकडे नोंदवल्या आहेत. या तक्रारींकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने त्यांनी ही चिंता सार्वजनिक पद्धतीने मांडण्याचा निर्णय घेतला.

mobile tower protest goa
Varca Accident Death: वार्कात कारची मोटरसायकलला धडक, एकाचा जागीच मृत्यू

एका संबंधित रहिवाशाने सांगितले की, "या टॉवरमुळे आमच्या स्थानिक समुदायाचे आरोग्य बरेच धोक्यात आले आहे." "आम्ही वारंवार पंचायतीला कारवाईसाठी सांगितले आहे, परंतु काहीही केले गेले नाही." मात्र दुसऱ्या बाजूने या टॉवर मालकांनी मात्र सर्व आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे आणि नियमांचे पालन करून टॉवर बसवण्यात आल्याचे माध्यमांना सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com