Drishti Marine lifeguards save 6 lives at Varca Beach: गोव्यातील पर्यटन हंगामला एक ऑक्टोबर पासून सुरवात झाली आहे. त्यामुळे राज्यातील विविध समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे.
त्यासोबतच पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही राज्य सरकारसह, इतर घटकांकडून तत्परता दाखवली जात आहे. शुक्रवारी, वार्का किनाऱ्यावर समुद्रात बुडणाऱ्या सहा पर्यटकांना दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी जीवदान दिले.
हे सर्व पर्यटक बंगळूरचे आहेत. ते ट्रीपसाठी गोव्यात आले आहेत. आज, शुक्रवारी ते वार्का बीचवर मौजमस्ती करत होते.
याच चार पुरूष आणि दोन महिलांचा समावेश होता. सहाही जण समुद्राच्या पाण्यात डुंबण्याचा आनंद घेत असताना त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते बुडू लागले.
दरम्यान, बीचवर तैनात असलेल्या दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी तत्काळ या पर्यटकांच्या दिशेने धाव घेतली.
त्या सहाही पर्यटकांना जीवरक्षकांनी सुखरूप किनाऱ्यावर आणले. दृष्टी मरिनच्या जीवरक्षकांनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल त्यांचे परिसरात कौतूक सुरू होते.
दरम्यान, पर्यटकांनीही किनाऱ्यावरील नियमांचे तसेच वेळोवेळी सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन दृष्टीकडून करण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.