डिचोलीच्या विकासासाठी आमदारांनी घेतली पालिका मंडळाबरोबर बैठक

डॉ. चंद्रकांत शेट्ये: डिचोलीच्या विकासासाठी प्रयत्नपूर्वक झटणार
Chandrakant Shetye News, Bicholim News Updates, Goa Political News Updates
Chandrakant Shetye News, Bicholim News Updates, Goa Political News UpdatesDainik Gomantak

डिचोली: पालिका मंडळाला विश्वासात घेऊन प्रलंबित प्रकल्प मार्गी लावून डिचोली शहराच्या विकासासाठी आपण अविरत प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही नवनिर्वाचित आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी दिली आहे. पालिका मंडळाला आपले वेळोवेळी सहकार्य मिळणार असून कोणतेही राजकारण न करता डिचोलीच्या विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवा, असे आवाहनही डॉ. शेट्ये यांनी पालिका मंडळाला केले. (Bicholim News Updates)

Chandrakant Shetye News, Bicholim News Updates, Goa Political News Updates
गोवा विधानसभेत 39 आमदारांची नवी टीम!

आमदारकीची शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदार डॉ. शेट्ये यांनी मंगळवारी (ता. 15) सायंकाळी डिचोली पालिका मंडळाबरोबर बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी विकासकामांचा आढावा घेतला.सर्वप्रथम पालिकेतर्फे नगराध्यक्ष कुंदन फळारी यांनी नवनिर्वाचित आमदार डॉ. शेट्ये यांचे स्वागत केले. यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी क्लेन मदेरा, अभियंता राजेश फडते, उपनगराध्यक्ष तनुजा गावकर, नगरसेवक सतीश गावकर, विजयकुमार नाटेकर, सुदन गोवेकर, रियाज बेग, नीलेश टोपले, अनिकेत चणेकर, गुंजन कोरगावकर, दीपा पळ, दीपा शिरगावकर, ॲड. अपर्णा फोगेरी, ॲड. रंजना वायंगणकर आणि सुखदा तेली तसेच माजी उपनगराध्यक्ष नारायण बेतकीकर आणि कमलाकर तेली आदी उपस्थित होते.

वीज केबल टाकण्याच्या कामाला प्राधान्य

शहरातील मॉडर्न फायर स्टेशन, प्राथमिक शाळा इमारत आदी जे प्रकल्प सुरू झाले आहेत. त्या प्रकल्पाच्या कामांना गती देतानाच बसस्थानक प्रकल्पही शक्य तितक्या तीव्र गतीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार. अत्यंत आवश्यक असलेल्या मल:निसारण प्रकल्पासह बहुउद्देशीय इमारत संकुल, क्रीडा मैदान आदी महत्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जलदगतीने पाठपुरावा करण्यात येईल. शहरात अत्यंत आवश्यक असलेल्या वीज केबल टाकण्याच्या कामालाही प्राधान्य देण्यात येईल, असेही डॉ. शेट्ये यांनी सांगितले.

Chandrakant Shetye News, Bicholim News Updates, Goa Political News Updates
गोव्यात 12 ते 14 वयोगटातील मुलांचे आजपासून लसीकरण

‘डिचोलीत शासकीय शिमगोत्सव होणार’

पर्यटन खात्यातर्फे यंदा डिचोली वगळता पाच शहरांत शासकीय शिमगोत्सव साजरा करण्यात येणार आहे. डिचोली शहर हे सांस्कृतिक शहर आहे. तेव्हा डिचोलीत यंदा शासकीय पातळीवरील शिमगोत्सव साजरा व्हावा. यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदार डॉ. शेट्ये यांनी पालिका मंडळाला दिले. गेल्या वर्षीच्या शिमगोत्सव समितीशी संपर्क साधून नियोजन करण्याची सूचनाही त्यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com