गोवा विधानसभेत 39 आमदारांची नवी टीम!

19 जण प्रथमच आमदार : गणेश गावकर हंगामी सभापती
Goa Assembly news, Goa Political News updates
Goa Assembly news, Goa Political News updatesDainik Gomantak

पणजी: सातव्या विधानसभेचा कार्यकाळ 16 मार्च रोजी संपत आहे. आज सातव्या विधानसभेला पाच वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे होते. यासाठीच राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी आपल्या विशेष अधिकारांचा वापर करत विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावले होते. यासाठी त्यांनी सावर्डेचे आमदार गणेश गावकर यांना हंगामी सभापती म्हणून नेमले होते. सभापती गावकर यांनी आज विधानसभेतील सर्व 39 ही सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आजच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात हा शपथविधी सोहळा झाला. (Goa Political News updates)

सभागृहासमोर इतर कोणतेही कामकाज नव्हते.सकाळी 11.30 वाजता विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली तत्पूर्वीच विधानसभेमध्ये पहिल्यांदाच आलेले 19 आमदार आणि 21 पुन्हा निवडून आलेले आमदार टप्या टप्याने आले.

Goa Assembly news, Goa Political News updates
मुरगावात खोट्या कागदपत्रांच्या आधारे बिगर गोमंतकीयांना सरकारी नोकऱ्या

ही विधानसभा अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण होते, नव्यानेच विधानसभेत दाखल झालेल्या आमदारांसाठी हा पहिला प्रसंग होता. त्यामुळे ते आपल्या कुटुंबांसह विधानसभेत पोहोचले होते सकाळी दहा वाजता आमदारांच्या विधानसभेत दाखल होण्याला सुरुवात झाली आणि टप्या टप्प्याने भाजप, काँग्रेस, गोवा फॉरवर्ड, मगोप, आम आदमी पक्ष ,आरजी आणि अपक्ष आमदारांचे विधानसभा परिसरात आगमन झाले.

आमदारांचा शपथविधी कार्यक्रम विधानसभेच्या पहिल्याच दिवशी असतो, तो दिवस आज असल्याने बहुतांशी आमदारांनी आपल्या समवेत कुटुंबीयाची विधानसभेच्या खास गॅलरीमध्ये बसण्याची सोय करण्यात आली होती.

विकासासाठी कार्य: वाझ

कुठ्ठाळी मतदारसंघातील अपक्ष आमदार अंतिनियो वाझ हे आपल्या स्कूटरवरून विधानसभा परिसरात पोहोचले, तर नव्याने विधानसभेत दाखल झालेल्या आरजी पक्षाचे वीरेश बोरकर बुलेटवरून विधानसभेत आले. इतरांनी मात्र आपल्या चार चाकी मधूनच येणे पसंत केले. विधानसभा परिसरात या नवनिर्वाचित आमदारांना माध्यम प्रतिनिधींनी बोलते करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बहुतांश जणांनी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपण कार्यरत राहू, असे सांगितले. डॉ. प्रमोद सावंत 11 वाजता विधानसभा परिसरात पोहोचले, त्यानी भाजपला बहुमत दिल्याबद्दल गोमंतकीयांचे आभार मानले.

Goa Assembly news, Goa Political News updates
गोव्यात बेकायदा रेती वाहतुकीला अभय

विधानसभेच्या निवडणुका या माझ्या नेतृत्वाखाली लढल्या होत्या आणि लोकांनी ऐतिहासिक बहुमतासह भाजपला निवडून दिले. साखळी मतदारसंघातील मतदारांनी मला तिसऱ्यांदा निवडून दिले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत अभियानाचे गोव्यासाठी स्वयंपूर्ण गोव्यामध्ये रूपांतर करण्यामध्ये भाजप सरकारला यश आले त्यामुळेच लोकांनी भाजपला सलग तिसऱ्या वेळी निवडून दिले.

-डॉ. प्रमोद सावंत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com