Goa Assembly Monsoon Session 2024: कायदा सुव्यवस्थेवरती आमदारांची नाराजी; अतिरिक्त दलाची मागणी

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे, महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरे बसवणे, भाडेकरूंची पडताळणी तीव्र करणे इ. मागण्या
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे, महत्त्वाच्या ठिकाणी  कॅमेरे बसवणे, भाडेकरूंची पडताळणी तीव्र करणे इ. मागण्या
Goa assembly monsoon session 2024 Dainik Gomantak
Published on
Updated on

पावसाळी विधानसभा अधिवेशनात मंगळवारी सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली. आमदारांनी पोलिसांची गस्त वाढवणे, महत्त्वाच्या ठिकाणी पाळत ठेवणारे कॅमेरे बसवणे, भाडेकरूंची पडताळणी तीव्र करणे आणि गोव्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस दल आणि वाहनांची संख्या वाढविण्याची मागणी केली.

कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी कांदोळी येथील अरनॉल्ड सुवारीस नावाच्या ज्येष्ठ नागरिकाच्या हत्येबाबत लक्षवेधी सूचना मांडली. ते म्हणाले की, गोव्यात विशेषतः किनारपट्टी भागात अनेक बिगरगोमंतकीय लोक भाड्याच्या घरांत राहतात. खेदाची गोष्ट म्हणजे स्थानिक लोक आपली मालमत्ता भाड्याने देण्यापूर्वी भाडेकरूची पडताळणी करत नाहीत. गोवा पोलिसांकडे या गोष्टींवर लक्ष ठेवण्याची यंत्रणा नाही. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस पोलिसांची गस्त आवश्यक आहे. बिट पोलिसांना सुसज्ज आणि गस्तीसाठी अतिरिक्त वाहने उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो यांनी खून झालेला व्यक्ती हा आपला दूरचा नातेवाईक असल्याचे नमूद करून पोलिसांनी या खून प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी केली. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनीही सोमवारी त्यांच्या गावात दरोडा पडल्याचे नमूद केले. सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून सायबर क्राइम सेलने हे सर्व गुन्हे वेबसाइटवर अपडेट करावेत, असेही ते यावेळी म्हणाले.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे, महत्त्वाच्या ठिकाणी  कॅमेरे बसवणे, भाडेकरूंची पडताळणी तीव्र करणे इ. मागण्या
Goa Assembly Monsoon Session 2024: बेकायदा बांधकामांमुळेच पूर, भूस्खलन; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश

फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनीही निवासी भागात पोलिसांची तीव्र गस्त आणि सीसी टीव्हीद्वारे पाळत ठेवण्यावर भर दिला. गोव्यात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिकट असल्याचेही त्यांनी नमूद केले.

हळदोणेचे आमदार कार्लुस फेरेरा यांनीही गोव्यात निवासी भागात व्हिडिओ पाळत ठेवणे, भाडेकरूंची पडताळणी करणे सक्तीचे केले पाहिजे, असे मत व्यक्त केले. आमदार विरेश बोरकर, व्हेंझी व्हिएगस, नीलेश काब्राल, रुडॉल्फ फर्नांडिस, उल्हास तुयेकर, चंद्रकांत शेट्ये, जेनिफर मोन्सेरात, अँथनी वाझ यांनीही आपापल्या मतदारसंघात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी केली.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवणे, महत्त्वाच्या ठिकाणी  कॅमेरे बसवणे, भाडेकरूंची पडताळणी तीव्र करणे इ. मागण्या
Goa Assembly Monsoon Session 2024: दुसऱ्याही दिवशी प्रश्‍नोत्तर तास गुंडाळला; हक्कभंगाचे बुमरँग सत्ताधाऱ्यांवर

भाडेकरूंची पडताळणी सुरू; मुख्यमंत्री

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, गोवा पोलिसांनी आधीच अरनॉल्ड सुवारीस खून प्रकरणातील संशयित व्यक्तीला अटक केली आहे आणि त्याला कर्नाटकातून गोव्यात आणले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले जात आहेत. या गुन्ह्यामागचा हेतू तपासला जात आहे. संपूर्ण गोव्यात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यांवर नाकाबंदी केली जात आहे. भाडेकरूंची पडताळणी सुरू असून पोलिस ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्या समस्या ऐकून घेत असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com