Goa Politics: मुख्यमंत्री भोमवासीयांना का भेटत नाहीत? : सरदेसाई यांचा सवाल

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भोम येथील लोकांना भेटून त्यांच्या समस्या का जाणून घेत नाहीत, असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला.
Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत भोम येथील लोकांना भेटून त्यांच्या समस्या का जाणून घेत नाहीत, असा सवाल गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी उपस्थित केला. या गावातील काही मुख्‍यमंत्र्यांकडून न्‍यायाची अपेक्षा बाळगून आहेत.

Vijai Sardesai
Goa Monsoon Update: पुन्‍हा धो-धो बरसणार,‘यलो अलर्ट’ जारी

देशाचे नाव अधिकृतपणे ‘भारत’ झाल्यावर त्यांचे मंदिर उद्‌ध्‍वस्त‍ होण्यापासून वाचवता येईल का, असा खोचक सवालही त्‍यांनी केला. दरम्‍यान, भोमवासीयांनी आज सरदेसाई यांची भेट घेऊन समस्‍या मांडली.

गोव्यात मंदिरे आणि हिंदू संस्कृतीचे रक्षण करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री भोम येथे जाण्‍याचे का टाळत आहेत? असा सवाल सरदेसाई यांनी केला.

पंचायत सदस्यांच्या मानधनाच्या मुद्यावर भाष्य करताना ते म्हणाले की, पंचायतमंत्री मविन गुदिन्हो हे गेल्या वर्षभरापासून पंचसदस्यांना मानधन देण्यास अपयशी ठरले आहेत. सध्या ते एका प्रकरणाची सारवासारव करण्यात व्यस्त आहेत.

Vijai Sardesai
Vegetables Price In Goa: चतुर्थीच्या तोंडावर भाज्‍या महागणार!

त्यांना महिला व बालकल्याण खाते द्यावे, जेणेकरून ते त्‍या खात्‍याला न्याय देऊ शकतील, असा टोला सरदेसाई यांनी हाणला.

इंग्रजी रेडिओ स्टेशन सुरू करा

एफएम रेनबो इंग्लिश रेडिओ स्टेशन बंद करण्याच्या निर्णय सरकारने मागे घ्यावा आणि गोव्यातील इंग्रजी रेडिओ स्टेशन एफएम रेनबो पुन्हा सुरू करावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली. या इंग्रजी रेडिओ स्टेशनवरून युवक इंग्रजी गाणी ऐकतात, असेही त्‍यांनी नमूद केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com