Vijai Sardesai
Vijai SardesaiDainik Gomantak

Vijai Sardesai: कुठला पोलिस किती पैसे खातो, कुणाला हप्ता जातो.. याची यादी माझ्याकडे; जपून बोला अन्यथा...

आमदार विजय सरदेसाई यांचा DGP जसपाल सिंग यांना इशारा
Published on

Vijai Sardesai: गोव्यातील एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी लोकप्रतिनिधींबाबत वक्तव्य केले होते. तसेच गोव्यातील क्राईम रेट कमी झाल्याचे वक्तव्य केले होते. त्यावरून फातोर्ड्याचे आमदार आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पोलिस महासंचालकांवर टीका केली आहे.

Vijai Sardesai
Goa Flight Rate Increased: गांधी जयंतीच्या लॉंग वीकेंडला गोव्यात येताय? मग विमान प्रवासाचे दर एकदा वाचाच

आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी मला शिकवू नये. मी लोकप्रतिनिधी आहे. लोकांनी मला निवडून दिले आहे. कोणता पोलिस किती पैसे खातो, कुणाला हप्ता जातो, याची यादी माझ्याकडे आहे.

सिंग यांनी माझ्याबाबत बोलताना विचार करून बोलावे, अन्यथा केंद्रीय गृहमंत्र्यांकडे तक्रार करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या आधीही विजय सरदेसाई यांनी गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यावरून सरकारवर तसेच पोलिस यंत्रणेवर टीका केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com