Goa Flight Rate Increased: गांधी जयंतीच्या लॉंग वीकेंडला गोव्यात येताय? मग विमान प्रवासाचे दर एकदा वाचाच

विमानभाड्याने तुमच्या खिशाला नक्कीच कात्री लागू शकते.
Goa Flight Rate Increased
Goa Flight Rate IncreasedDainik Gomantak

Goa Flight Rate Increased: वीकेंडला सुट्टी असली की देशी पर्यटकांची पावले आपसूकच गोव्याकडे वळतात. गांधी जयंतीच्या दीर्घ सुट्टीनिमित्त गोव्यात येण्याचा प्लॅन असेल तर विमानभाड्याने तुमच्या खिशाला नक्कीच कात्री लागू शकते.

Goa Flight Rate Increased
Selaulim Water Level: यंदा 23 वर्षातील सर्वाधिक पाऊस; मात्र साळावलीतील पाणीसाठा गेल्यावर्षीपेक्षा कमीच...

28-29 सप्टेंबरपासून गोव्यात येण्यासाठी विमानभाडे तब्बल तीन पटीने वाढले आहे. 28 आणि 29 सप्टेंबरला पुणे ते गोवा मार्गावरील विमान भाडे सुमारे 13,000 रुपये असणार आहे. या मार्गावरील नियमित विमान भाडे सुमारे 4,500 रुपये आहे.

2-3 ऑक्टोबरला पुण्याला परतण्यासाठी विमानाच्या तिकिटाची किंमत देखील सुमारे 11,000 रुपये असणार आहे. गांधी जयंतीची सार्वजनिक सुट्टी सोमवारी येते, ज्यामुळे 29 सप्टेंबरच्या शुक्रवारपासून वीकेंडच्या सुट्टीचा दिवस सुरू होतो.

दुसरीकडे, बेंगळुरू-गोवा प्रवासासाठी तब्बल 7,000 मोजावे लागणार आहेत. या मार्गावरील नेहमीचे भाडे सुमारे 2,400 रुपये आहे. सुट्टीनंतर बंगळुरूला परतण्यासाठी विमान तिकीट आणखी महाग असून तिकिटाची किंमत 8,900 रुपये आहे.

मुंबई ते गोवा विमान प्रवासासाठी याआधी 3000 मोजावे लागत होते, तिथे आता तिकिटाची किंमत सुमारे 8,900 रुपये आहे. मुंबईला परतण्यासाठी देखील एवढेच पैसे मोजावे लागणार आहेत..

लाँग वीकेंडसाठी चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता मार्गावरील विमान भाडेही दुप्पट झाले आहे. तसेच गोव्यात येण्यासाठी बसच्या भाड्यातही वाढ झाली आहे. बेंगळुरू ते गोवा बसमधील AC स्लीपर सीटची किंमत 30 सप्टेंबरपासून 3,000 ते 4,400 रुपये आहे.

त्यामुळे, वीकेंडलाजर गोव्यात येत असाल तर आधी प्रवास भाड्याची माहिती नक्की करून घ्या

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com