Vijai Sardesai on Unity Mall Place: राज्यांमधील हस्तकला उत्पादनांच्या विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राच्या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत प्रत्येक राज्यात 'युनिटी मॉल' बांधण्यात येणार आहेत.
गोव्यातील 'युनिटी मॉल'साठी मेरशीमधील जागा निश्चित करण्याचा निर्णय सरकार घेत आहे. मात्र त्या जागेबाबत गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी विरोध दर्शवला आहे.
'युनिटी मॉल'साठीच्या प्रस्तावित जागेमुळे 70 हजार चौरस मीटर खारफुटी आणि 20 हजार चौरस मीटर भातशेती नष्ट होण्याचा धोका आहे. त्यामुळे मॉलसाठी दुसरी जागा शोधण्याचा प्रस्ताव मी मुख्य सचिवांना केला आहे.
जर हे मान्य झाले नाही, तर याबाबत न्यायालयात धाव घेणार असल्याचा इशारा यावेळी सरदेसाईंनी दिला. त्यामुळे आता यावर सरकारच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
गोव्यातील हस्तकला, कला आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविण्याच्या अनुषंगाने राज्य सरकार 'युनिटी मॉल'ची गोव्यात स्थापना करणार आहे. युनिटी मॉल राज्यात येणाऱ्या पर्यटकांना गोव्याचे वैभव अनुभवण्यासाठी वन-स्टॉप डेस्टिनेशन ठरेल; तसेच यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.