‘मी निर्णय घेण्यास चुकलो. मला माफ करा' खरी कुजबूज!

रेजिनाल्ड यांचा माफीनामा..
Goa Assembly Election 2022
Goa Assembly Election 2022 Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Assembly Election 2022

मायकल इफेक्ट?

तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर खरी घुसमट होत होती ती आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचीच. त्यामुळे कधी आलेक्स सिक्वेरा यांची भेट घे, कधी विजय सरदेसाई यांची भेट घे असे त्यांचे चालू होते. कुठल्याही परिस्थितीत त्यांना स्वगृही परतण्याची आस लागली होती. कारण कुडतरीत लोकांच्या दारात जाऊन प्रचार करतेवेळी लोक त्यांना म्हणायचे, घाबरू नका, आम्ही काँग्रेस बरोबरच आहोत. याचमुळे ते अस्वस्थ झाले होते, पण त्यांना काँग्रेसमध्ये परतायची दारे काही खुली होत नव्हती, पण त्यांचे वैयक्तिक मित्र मायकल लोबो काँग्रेसमध्ये आल्यावर चक्रे वेगाने फिरली आणि रेजिनाल्डलाही काँग्रेसची जुनी वाट सापडली. याच वाटेवर चर्चिल आलेमाव हेही आहेत असे सांगतात. खरे का हो हे? प्रशांत किशोर यांना कुणीतरी विचारले पाहिजे बुवा! ∙∙∙

राखीचा बडा भाई!

आज इथे तर उद्या तिथे असे करण्यात आमच्या सांगेच्या राखी ताई माहीर असेच आम्हाला त्यांचे राष्ट्रवादी, शिवसेना, तृणमूल व्हाया काँग्रेस हा प्रवास बघून वाटले होते, पण आमचे कुडतरीचे रेजिनाल्ड भाऊ यांनी काल रविवारी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना एकाच महिन्यात जो धोबीपछाड दिला तो पाहून हे राखीचे बडेभाई असेच वाटले. त्यांच्याही काँग्रेसमध्ये असताना प्रमोद सावंत यांच्याही सलगी ठेवणे, मधेच आपमध्ये जाण्याची हुल उठविणे, नंतर तृणमूलमध्ये उडी घेणे आणि एका महिन्यातच त्यांना वाकुल्या दाखवून परत फिरणे या कला काही कमी मोलाच्या म्हणायच्या का? ∙∙∙

(MLA Reginald Lawrence apologized)

Goa Assembly Election 2022
गोव्यात पूर्ण बहुमत न मिळाल्यास..: अरविंद केजरीवाल

गिरीशची भविष्यवाणी खरी ठरली

रेजिनाल्ड जेव्हा तृणमूलमध्ये (TMC) गेले तेव्हा काँग्रेस प्रदेश अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी कुडतरी येथील सभेत रेजिनाल्ड हे अत्यंत अस्थिर राजकारणी असून तृणमूलमध्ये तरी ते स्थिर राहतील का याची शंका आहे असे म्हटले होते. गिरीशची ती भविष्यवाणी काल खरी ठरली. त्या सभेत गिरीशने रेजिनाल्ड काँग्रेसमध्ये असतानाही कसे पक्ष विरोधी काम करायचे. पैशांची हाव कशी बाळगून होते याबद्दल बरेच काही सांगत श्रोत्यांच्या टाळ्याही घेतल्या. आता रेजिनाल्ड म्हणे पुन्हा काँग्रेसमध्ये येत आहेत. आता गिरीश त्यांच्याबद्दल काय बोलणार? ∙∙∙

रेजिनाल्ड हे वागणं बरं नव्हं!

कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लॉरेन्स (MLA Reginald Lawrence) यांनी काँग्रेस सोडून तृणमूलची साथ धरली होती. त्यापूर्वी ते आपच्या वाटेवर होते. आता अवघ्या थोड्याच दिवसांनी त्यांनी तृणमूलला सोडचिठ्ठी दिली. कदाचित ते पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार. रेजिनाल्ड म्हणजे राजा. राजाने राजासारखे वागावे लागते. रेजिनाल्डना स्वतःवरच विश्वास नाही का? असा प्रश्न पडायला लागला आहे. ज्या नेत्याची निर्णय क्षमता एवढी कमजोर तो कसले कपाळाचे नेतृत्व देणार? दुसऱ्या बाजूने काँग्रेसलाही अक्कल नाही. जो माणूस सोडून जातो त्याला पुन्हा पक्षात घेणे स्वाभिमान नावाची चीड आहे की नाही? साहेब आपण राजासारखे वागले नाहीत, असेच लोक म्हणू लागले आहेत. ∙∙∙

उमेदवारी जाहीर करा ना!

कोणतीही गोष्ट जास्त ताणली की नंतर लोकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. कुंकळ्ळी भाजपची (BJP) उमेदवारी स्थानिक आमदार क्लाफास डायस यांना मिळणार असे सांगण्यात येते. क्लाफासने आपला प्रचारही सुरू केला आहे. असे असले तरी क्लाफासना भाजप उमेदवारी देणार नाही असे पिल्लू सोडले जात आहे. भाजपने क्लाफासचा पत्ता कापला, भाजप उमेदवारी सुदेश भिसे किंवा संतोष फळदेसाईंना मिळणार असे पोस्ट आजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. म्हणून डायस समर्थक म्हणायला लागले आहेत. साहेब एकदा औपचारिकपणे उमेदवारी जाहीर करा ना! ∙∙∙

मतांचे राजकारण

सारस्वताला निवडून देणारा मतदारसंघ अशी मडगावची ओळख आहे हे खरे असले, तरी या शब्दाची चर्चा आता इतकी आजवर कधीच झाली नव्हती. तसे पाहिले तर स्वतःचा आमदार पाडवावा इतके सारस्वत मतदार तेथे नाहीत. दुसरे म्हणजे एकेकाळी तसे ते असले तरी आता ते अन्यत्र स्थलांतरीत झालेले आहेत. जे उरले आहेत ते विविध गटांत विखुरलेले आहेत ही वस्तुस्थिती असली तरी संबंधित त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. ∙∙∙

ही एकजूट अशीच राहावी

कुडचडे काँग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजपावर आरोपपत्र ठेवण्यासाठी कुडचडे गट काँग्रेस कार्यालयात सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक बोलावून भाजपने राज्यात केलेले भ्रष्टाचार असो किंवा सरकारला आलेले अपयश असो ते लेखी स्वरूपात जनतेसमोर सादर करण्यासाठी जो उपक्रम आयोजित केला होता त्यात काँग्रेस पक्षाचे संभाव्य उमेदवार म्हणून गणले जाणारे अमित पाटकर, बाळकृष्ण होडारकर आणि ॲड. हर्षद गावस देसाई यांच्यासह अन्य प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते. कुडचडे शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी निवडणूकपूर्व काँग्रेस पक्षाची एकजूट पाहून अनेकांनी समाधान व्यक्त करून ही एकजूट जर निवडणुकीपर्यंत अशीच अभेद्य राहिली, तर काँग्रेस पक्षाला विजय लांब नसल्याचे शहरात बोलत होते. ∙∙∙

Goa Assembly Election 2022
GMC कोरोनाच्या विळख्यात; 200 हून अधिक डॉक्टर, आरोग्य कर्मचारी बाधित

छुपे रुस्तम

स्वतःला भाजप नेते समजणारे काही व्यक्ती या वेळेस आपण मडगावात कॉंग्रेस उमेदवार दिगंबर कामत यांच्या पाठीशी आहोत असे वारंवार सांगत सुटले आहेत. मात्र, हे या वेळेसच का सांगावे लागते. भाजपचे रुपडे घालून हेच लोक सदैव कामत यांच्याच संपर्कात तर होते असे लोक म्हणताना आढळतात. काही कार्यकर्ते आता म्हणू लागले बरे झाले. या लोकांनी कामत यांना उघड पाठिंबा दर्शविले ते. पूर्वी हे भाजप बरोबर असायचे म्हणून काहीजण मुद्दाम कामत यांना मतदान कारायचे. आत्ता ते कामत यांच्याबरोबर आहेत म्हणजे पुन्हा उलटा परिणाम हा नक्कीच. आहे ना गंमत छुप्या रुस्तमांची. ∙∙∙

रेजिनाल्डचा माफीनामा

अवघ्या 27 दिवसांत तृणमूल काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याची घोषणा आलेक्स रेजिनाल्ड यांनी रविवारी केली. रेजिनाल्ड हे गेल्या दोन महिन्यांपासून तसे चर्चेत होते. काँग्रेसवर धडाधड आरोप करतानाच ते पक्ष सोडणार हे लक्षात आले होते. तृणमूल गोव्यात आल्यानंतर त्यांची फुले स्वीकारणाची तयारी त्यांनी केली होती. मात्र मतदार संघात फिरल्यानंतर लोक आपल्या निर्णयावर नाराज असल्याचे त्यांच्या लक्षात आले आता निवडणुका जवळ आल्याने मतदारांची नाराजी विचारात घेणे गरजेची वाटणे साहजिकच. ‘मी निर्णय घेण्यास चुकलो. मला माफ करा,’ असे मतदार संघातील जनतेला आवाहन करीत त्यांनी लोकांची माफीही सुद्धा मागितली. रेजिनाल्डवर ही वेळ का आली? आपल्या मतदार संघातील लोकांचा अभ्यास असतानाही त्यांनी असा का निर्णय घेतला होता, हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरीत आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com