Calangute : कळंगुटमध्ये छम छम सुरुच; आमदार लोबोंसह स्थानिक अ‍ॅक्शन मोडमध्ये

कळंगुट किनाऱ्यावर डान्सबारसह अवैध प्रकार सुरु असल्याचा नागरीकांचा आरोप
Beach Party
Beach PartyDainik Gomantak

गोवा राज्यातील किनारी भागातमध्ये रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारची संगीत पार्टी आयोजित करण्यावर उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. त्यामुळे रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारची संगीत पार्टी केल्यास कारवाई केली जात आहे. या प्रकरणात गोवा पोलिसांनी भरारी पथके तयार करत कारवाई सुरु आहे. तरी देखील कळंगुट किनाऱ्यावर डान्सबार, अमली पदार्थ तस्करीचे सुरुच असल्याचा आरोप आज आमदार लोबोंसह स्थानिक नागरीकांनी केला आहे.

(mla michael lobo say illegal night parties are going on at calangute beach)

मिळालेल्या माहितीनुसार आज आज कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्यासह स्थानिक पंच आणि नागरीकांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली व आपल्या तक्रारीचा पाढा वाचला आहे. यावेळी बोलताना नागरीक म्हणाले की, ही समस्या गेल्या बारा वर्षांपासून सुरु आहे. नागरीकांनी आतापर्यंत ही समस्या सहन केली आहे.

Beach Party
Panaji: ड्रग्ज प्रकरणातील रशियन आरोपी सुनावणी होताच झाला फरार, पोलिसांना दिला चकवा

नागरीकांनी तक्रारीचा सुरु आळवताना म्हटले की, बंदीचे आहेत मात्र तरी देखील अद्याप डान्सबार, अमली पदार्थ तस्करी, हे प्रकरार सऱ्हास सुरु आहेत. त्यांना आता आळा घालणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही आज पोलीस महासंचालकांची भेट घेत त्यांना यावर आवर घालण्यासाठी विनंती करणार असल्याचं म्हटले आहे.

Beach Party
Gajanan Sawant Attack: मुंबई HC ची गोवा सरकारला नोटीस, 6 दिवसांत उत्तर देण्याचे आदेश

यावेळी बोलताना आमदार लोबो म्हणाले केली, ग्रामपंचायतीने कारवाई केलेले डान्सबार अद्याप बंद आहेत. मात्र इतर काही ठिकाणी ग्राहकांना रसत्यावर येत बोलावले जाते. व प्रलोभने दाखवत हॉटेलमध्ये आत घेऊन जातात. तेथे कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने ग्राहकाला फसल्याचे लक्षात आल्यानंतर तो पैसे मागतो व अशावेळी त्याला मारहाण केली जाते असे प्रकार आता सुरु झाल्याचं लोबो म्हणाले. आता आम्ही पर्यटनाचा दर्जा उंचावण्यासाठी गांभिर्याने विचार करत आहोत. त्यामुळे अशा प्रकारांना आता आळा घालणे अत्यावश्यक असल्याचं लोबो म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com