Michael Lobo: राज्यातील तरुणांनी मायनिंग ऐवजी पर्यटन व शेतीकडे वळावे

अप्रत्यक्ष राज्यातील बेरोजगारी केली मान्य
Michael Lobo
Michael LoboDainik Gomantak

गोवा राज्यात खाण व्यावसाय सुरु होण्यास अद्याप बराच वेळ आहे. त्यामूळे राज्यातील युवकांनी पर्यटन व शेती व्यवसायाकडे वळावे असे कलंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी राज्यातील युवकांना सल्ला दिला. एका बँकेच्या उद्घाटन प्रसंगी ते पर्वरी येथे बोलत होते.

(MLA Michael Lobo said Goa Unemployed Youth should turn to tourism and farming)

राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात खाण व्यावसाय सुरु होणार आहेच. मात्र यासाठी काही वेळ जाणार असून तोपर्यंत युवकांनी खाण व्यवसायात रोजगार मिळेल याची वाट न पाहता रोजगार आणि उद्योगासाठी पर्यटन व शेतीकडे वळणे आवश्यक आहे. असे आमदार लोबो म्हणाले.

Michael Lobo
Goa IIT: सांगे, केपे,कुठ्ठाळीतील शेतकऱ्यांचा IIT प्रकल्पाला विरोध कायम

मुख्यत: बेरोजगार असणाऱ्या युवकांनी यावर विचार करावा कारण आजच्या स्थितीमध्ये पैसे कमावणे आवश्यक त्यामूळे पर्यटन व शेतीकडे वळत यातच आपले करियर करावे. काही कालावधीनंतर खाण व्यावसाय आपल्याला मदत करेल पण याला काही कालावधी द्यावा लागणार असल्याचं ते म्हणाले.

Michael Lobo
Goa Project: 'मोक्ष'ची रचना ठरली जागतिक पातळीवर लक्षवेधी!

अप्रत्यक्ष राज्यातील बेरोजगारी केली मान्य

राज्यात अनेक भाजप नेते आणि मंत्री बेरोजगारीबाबत मौन बाळगतात असे असताना आज मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि कलंगुटचे आमदार मायकल लोबो एका बँकेच्या उद्घाटन प्रसंगी एकाच व्यासपीठावर असताना लोबो यांनी हा मुद्दा चर्चेत घेतला. यावेळी लोबो मुख्यमंत्र्यांना बेरोजगारीवरुन काही सल्ला देतात का? याकडे ही उपस्थितांचे कान होते. मात्र लोबोंनी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांकडे न वळवता राज्यातील युवकांनी काय करावे या कडे वळवल्याने याला बगल मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com