Michael Lobo: दुय्यम दर्जाचे रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे किंवा गुन्हे दाखल होण्याची गरज आहे तेव्हाच रस्ते कामांचा दर्जा सुधारेल, असे लोबो म्हणाले
Michael Lobo|Goa Bad RoadsDainik Gomantak

रस्त्यांचा सुमार दर्जाच कारणीभूत! अधिकाऱ्यांबरोबर कंत्राटदारही जबाबदार; आमदार लोबो

Michael Lobo: दुय्यम दर्जाचे रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे किंवा गुन्हे दाखल होण्याची गरज आहे तेव्हाच रस्ते कामांचा दर्जा सुधारेल, असे लोबो म्हणाले
Published on

Bad Roads In Goa

पणजी: राज्यातील बहुतेक रस्त्यांवर वाहनचालकांना नियम तसेच परिसराची माहिती देणारे फलक नाहीत. त्यामुळे पर्यटकांचा गोंधळ उडतो. रस्त्यांवरील खड्डे बुजविलेले नाहीत. पाऊस पडल्याने रस्ते खराब होतात, हे कारण पटणारे नाही. सुमार दर्जा त्याला कारणीभूत आहे. त्याला काही प्रमाणात अधिकाऱ्यांबरोबर कंत्राटदारही जबाबदार आहेत, असे आमदार मायकल लोबो म्हणाले.

वाहतूक पोलिसांकडून पर्यटकांच्या सतावणुकीसंदर्भात पोलिस महासंचालक आलोक कुमार यांना भेटल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत रस्ता अपघातांचे प्रमाण वाढले असून त्यामध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या २०० वर गेली आहे. हे प्रमाण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी चिंताजनक आहे.

पालकांनी परवाना असलेल्या मुलांना हेल्मेट घालण्याची सक्ती करावी. अंतर्गत रस्त्यावर काही अल्पवयीन मुले दुचाकी भरधाव वेगाने चालवतात आणि अपघाताला आमंत्रण देतात. जेथे अपघातप्रवण क्षेत्र आहे, तेथे पोलिसांनी स्थानिक रहिवासी आणि पंचायतीसोबत बैठक घेऊन त्यावर तोडगा काढावा.

त्यात सार्वजनिक बांधकाम तसेच वाहतूक खात्यालाही सहभागी करून घ्यावे. दुय्यम दर्जाचे रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे किंवा काहीजणांवर गुन्हे दाखल होण्याची गरज आहे. तेव्हाच रस्ते कामांचा दर्जा सुधारेल, असे लोबो म्हणाले.

महासंचालकांकडून दक्षतेची ग्वाही

एखाद्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, हेल्मेट घातले नाही किंवा ‘नो एन्ट्री’मध्ये घुसल्यास त्यांना अडवावे. परंतु एखाद्या ठिकाणी चौकशी केल्यानंतर पुन्हा दुसऱ्या ठिकाणी पोलिसांकडून चौकशी का केली जाते, असा प्रश्‍न महासंचालकांना करण्यात आला. यावेळी महासंचालकांनी पर्यटकांना नाहक चौकशीच्या नावाखाली त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, असे आश्‍वासन दिल्याचे आमदार लोबो म्हणाले.

 Michael Lobo: दुय्यम दर्जाचे रस्ते करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे किंवा गुन्हे दाखल होण्याची गरज आहे तेव्हाच रस्ते कामांचा दर्जा सुधारेल, असे लोबो म्हणाले
Bad Roads In Goa: 'कारवाई व्हायलाच हवी'! खराब रस्त्यांबाबतच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला ढवळीकरांकडून समर्थन

कारवाईचे ‘टार्गेट’

लोबो यांनी पर्यटकांच्या सतावणुकीकडे पोलिस महासंचालकांचे लक्ष वेधून वाहतूक पोलिसांकडून ठिकठिकाणी होणारी चौकशी संशयास्पद असल्याचे सांगितले. पोलिसांना प्रत्येक दिवशी दंडात्मक कारवाईचे लक्ष्य वरिष्ठांकडून दिले जाते. त्यामुळे पोलिसांकडून ही कारवाई केली जाते, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com