Vasco : वास्कोतील उरली सुरली शेती टिकायला हवी; आमदार साळकर यांच्याकडून कृषी साहित्याचे वाटप

''बेलाबाय भागात शेतकऱ्यांनी कष्टाने कृषी परंपरा जोपासली''
Vasco
VascoDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: कधीकाळी वास्को परिसरातही शेती व्हायची असे सांगितले तर ते आता कोणाला खरे वाटणार नाही. परंतु बंदरावर वसलेल्या या शहराचा आणि बंदराचा जसजसा विकास होत गेला तसे येथील कृषी संस्कृतीचा ऱ्हास होत गेला; परंतु येथील बेलाबाय भागात काही शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने कृषी संस्कृतीची परंपरा जोपासली आहे. याला प्रोत्साहन देण्यासाठी वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी बेलाबाय सर्व शेतकऱ्यांना ट्रॅक्टर आणि खते दिली.

(MLA Krishna Salkar has said that the last agricultural culture in Vasco area should survive)

Vasco
PM Visit To Goa : मोदीजी या, पण गोव्याची 'ही' काळी बाजू पाहू नका; रात्रीच्या संगीत पार्ट्यांमुळे स्थानिक संतापले

आज वास्को परिसरातील ही शेवटची ही कृषी संस्कृती जगावी यासाठी येथील शेतकरी जेवढे प्रयत्नशील आहेत, याला आमदार दाजी ऊर्फ कृष्णा साळकर यांनी प्रोत्साहन दिले आहे. गेल्या चौदा वर्षांपासून साळकर वास्कोतील ही कृषी संस्कृती जगावी यासाठी या शेतकऱ्यांना शक्य ती मदतीसाठी प्रयत्नात आहेत. यावेळी नगराध्यक्ष लियो रॉड्रीगिस, स्थानिक नगरसेवक गिरीश बोरकर, नगरसेविका शमी साळकर, आदी उपस्थित होते.

Vasco
Yuri Alemao: मोदींनी उघड केलेले 'विशेष दर्जा'चे भूत अजूनही गोव्याच्या मानगुटीवरटच!

साळकर यांनी यावेळी सांगितले की, वास्को शहरात बेलाबाय भागात एकमेव शेती बाकी आहे. शेतीची ही संस्कृती जपून ठेवणे आवश्यक आहे. भाजी व अन्य पीक येथे घेतले जाते. या शेतीतून या शेतकऱ्यांना विशेष फायदा होत नसला तरी त्यानी ही परंपरा कष्टाने जोपासली आहे.

कोविडच्या काळात बेलाबाय येथील भाजीला मोठी मागणी होती. शहरातील अनेक लोकांनी ही भाजी खरेदी केली. स्थानिक भाजीला बाजारात मोठी मागणी आहे. प्रोत्साहन मिळाल्यास हे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणात भाजी पिकवू शकतात. इतर लोकांनीही शेती करण्यास पुढाकार घ्यावा. या शेतकऱ्यांना सरकारी अनुदान मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, असे यावेळी साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com