Illegal Fishing: 'बोट्स माझ्या नावावर नाहीत!' आमदार नाईक आक्रमक, सीझ ट्रॉलर्सच्या आरोपांवर पलटवार; म्हणाले, ''माफी मागा!''

Kedar Naik denies ownership: गोव्यातील काही फिशिंग ट्रॉलर्स महाराष्ट्र किनारपट्टीवर जप्त करण्यात आल्याच्या घटनेवरून गदारोळ माजला
Kedar Naik news
Kedar Naik newsDainik Gomantak
Published on
Updated on

MLA demands apology: गोव्यातील काही फिशिंग ट्रॉलर्स महाराष्ट्र किनारपट्टीवर जप्त करण्यात आल्याच्या घटनेवरून गदारोळ माजला आहे. याच प्रकरणात, एका पत्रकार परिषदेत आमदार केदार नाईक यांचे नाव गोवण्यात आले होते. मात्र, या गंभीर आरोपांवर आमदार नाईक यांनी शनिवारी (दि.२९) तातडीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आणि त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. सीझ केलेल्या ट्रॉलर्सशी आपला कोणताही वैयक्तिक संबंध नसल्याचा दावा त्यांनी ठामपणे केला आहे.

'बोट्स माझ्या नावावर नाहीत': आमदारांचा खुलासा

आमदार केदार नाईक यांनी स्पष्ट केले की, 'ज्या ट्रॉलर्सबद्दल सध्या वाद सुरू आहे, त्या माझ्या मालकीच्या नाहीत आणि त्यापैकी कोणतीही नौका माझ्या नावावर नोंदणीकृत नाही.' त्यांनी नमूद केले की, त्यांच्या कुटुंबाचा जुन्या काळापासून मच्छीमारीचा व्यवसाय आहे आणि त्यांच्या वडिलांच्या काळापासून या बोट्स कार्यरत आहेत.

Kedar Naik news
Illegal Fishing: भाजप आमदाराच्या मालकीचा ट्रॉलर जप्त? महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी! अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई

हा कौटुंबिक आणि पारंपरिक व्यवसाय असला तरी, सीझ झालेल्या ट्रॉलर्सशी आपला थेट मालकी हक्क नाही. "विनाकारण माझे नाव यात ओढले गेले आहे आणि केलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत," असे त्यांनी ठामपणे सांगितले.

'माफी मागावी' - आमदारांची मागणी

आरोपांची तुलना करताना आमदार नाईक यांनी थेट आरोप करणाऱ्यांनाच प्रतिप्रश्न केला. "ज्यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यांच्या कुटुंबातही आणि त्यांच्या भावांचीही स्वतःच्या मालकीची बोट्स असू शकतात, पण याचा अर्थ ते सीझ झालेल्या प्रत्येक ट्रॉलर्सशी जोडले जातात असे नाही," असे ते म्हणाले.

आपला युक्तिवाद अधिक बळकट करत त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, या ट्रॉलर्सशी आपला काहीही संबंध नाही. ज्यांनी सार्वजनिकरित्या त्यांचे नाव घेतले, त्यांनी आता माफी मागावी, अशी कठोर मागणी आमदार नाईक यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com