Illegal Fishing: भाजप आमदाराच्या मालकीचा ट्रॉलर जप्त? महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बेकायदेशीर मासेमारी! अधिकाऱ्यांकडून मोठी कारवाई

Goa BJP MLA trawler seized: एलईडी मासेमारी उपकरणांचा वापर करून मासेमारी करत असल्याप्रकरणी गोव्यातील दोन ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत.
Goa BJP MLA trawler seized
Goa BJP MLA trawler seizedDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत बंदी असलेल्या एलईडी मासेमारी उपकरणांचा वापर करून मासेमारी करत असल्याप्रकरणी गोव्यातील दोन ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी जप्त केल्या आहेत. गुरुवारी करण्यात आलेल्या या कारवाईत संबंधित ट्रॉलर्स महाराष्ट्राच्या सागरी अधिकारक्षेत्राचे उल्लंघन करत असल्याचे स्पष्ट झाले असून स्थानिक कायद्यांनुसार ही पद्धत बेकायदेशीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

एलईडी लाईट्सच्या मदतीने मासेमारी केल्यास मोठ्या प्रमाणावर मासे आकर्षित होतात, ज्यामुळे सागरी परिसंस्थेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने या प्रकारच्या उपकरणांवर बंदी घातली असून, त्या नियमांचे उल्लंघन झाल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या ट्रॉलर्सपैकी एक गोव्यातील भाजप आमदाराच्या मालकीची असल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेमुळे आंतरराज्य सागरी हद्दीतील नियंत्रण आणि बेकायदेशीर मासेमारीविरोधातील कारवाईबाबत चर्चेला उधाण आले आहे.

Goa BJP MLA trawler seized
Goa ZP Election: प्रियोळ ‘झेडपी’वर ‘मगो’चा वरचष्मा! ढवळीकरांची रणनीती आखायला सुरुवात; गावडेंच्या भूमिकेवर लक्ष

दरम्यान, सागरी जीवसृष्टीला धोका निर्माण करणाऱ्या या प्रतिबंधित एलईडी उपकरणांच्या वापरावर कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात अशा प्रकारचे उल्लंघन रोखण्यासाठी संयुक्त पथकांच्या माध्यमातून नियमित गस्त वाढवण्याचा निर्णयही घेतला जाणार आहे.

Goa BJP MLA trawler seized
Goa Crime: गोव्यात आला कामाच्या शोधात, सोबत आणला गांजा; ओडिशातील 29 वर्षीय युवकाच्या आवळल्या मुसक्या

बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी सागरी कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचा पुनरुच्चार अधिकाऱ्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com