Mandrem Constituency: पर्यटनाला चालना देण्यासाठी चोपडे ते केरी रस्त्याचे रुंदीकरण; ४३ कोटींचा खर्च

Jit Arolkar: आमदार जीत आरोलकर यांनी आज पत्रकारांना माहिती दिली.
Jit Arolkar: आमदार जीत आरोलकर यांनी आज पत्रकारांना माहिती दिली.
Mandrem ConstituencyMLA Jit ArolkarDainik Gomantak

मांद्रे मतदारसंघात पर्यटनाला चालना देण्यासाठी चोपडे ते केरी रस्त्याचे सुमारे ४३ कोटी रुपये खर्चून काम हाती घेण्यात येणार आहे,अशी माहिती आमदार जीत आरोलकर यांनी आज पत्रकारांना दिली.

आगरवाडा -मांद्रे तिठ्यावर रस्त्याच्या रुंदीकरणाची पाहणी मंगळवारी दुपारी त्यांनी केली. यावेळी पेडणे तालुका उप जिल्हाधिकारी शिवकुमार नाईक, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता गावस, मंद्रेचे सरपंच प्रशांत नाईक, उपसरपंच तारा हडफडकर,पंच किरण सावंत, आगरवाडा चोपडेचे सरपंच सचिन राऊत,उपसरपंच शिल्पा नाईक, पंच ॲंथनी फर्नांडिस, संगीता नाईक, पंच लिंगूडकर आदींसह विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी आमदार आरोलकर यांनी रस्ता रुंदीकरणासाठी आरक्षित केलेल्या जमिनीच्या नकाशावरून वाहतुकीला अडथळा न ठरता कमीत कमी चोपडेपासून ८ मीटर रस्ता रुंद करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या रस्त्यात अडथळा ठरणारी कच्ची बांधकामे तोडली जातील,असेही ते म्हणाले.

विद्यमान सरपंच रोषास कारण ठरतील !

भू संपादन करून बरीच वर्षे निघून गेली आहेत.काही ठिकाणी रस्त्याला अडथळा ठरणारी बांधकामे झाली आहेत. अशावेळी ही आता ही बांधकामे मोडीत गेल्यास नागरिकांच्या रोषाला विद्यमान पंचायत मंडलाळा जावे लागेल. त्यामुळे हा प्रश्र्न नाजूकपणे हाताळावा लागेल, असे मांद्रे सरपंच प्रशांत नाईक व आगरवाडा सरपंच सचिन राऊत म्हणाले.

Jit Arolkar: आमदार जीत आरोलकर यांनी आज पत्रकारांना माहिती दिली.
Goa Road Accident: गोव्यात 3 अपघातांत 3 ठार; संतप्‍त लोकांनी रोखला महामार्ग

नागरिकांनी सहकार्य करावे; उपजिल्हाधिकारी

गोव्यात वाहनांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.वाढत्या वाहनांना रुंद रस्त्यांची खरीच गरज आहे. इथल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी दूरदृष्टी बाळगून रस्त्याचे रुंदीकरण काळाची गरज आहेच. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे उपजिल्हाधिकारी शिवकुमार नाईक म्हणाले

भू-संपादनापूर्वीच्या घरांना अभय

चोपडे केरी रस्ता रुंदीकरणासाठी जमीन संपादन काही वर्षा पूर्वीच झाले आहे. जमिनीचा मोबदला यापूर्वी जमीन मालकांना देण्यात आला आहे.असे असताना काहींनी आस्थापने उभारून अतिक्रमण केले आहे.अशी रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारी किरकोळ बांधकामे हटवण्यात येतील. मात्र, कुणाच्या घराला हात लावला जाणार नाही,असे आमदार जित आरोलकर यावेळी म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com