Govind Gaude: "स्लॅब पडणे आणि छत कोसळणे यात फरक असतो", कला अकादमीच्या वादावरून आमदार गावडेंची 'माध्यमांवर' टीका

Govind Gaude slab collapse controversy: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या उपस्थितीत, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी पत्रकारांवर जोरदार टीका केली
Goa cultural academy controversy
slab collapse controversy goaDainik Gomantak
Published on
Updated on

Kala Academy Controversy: जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या उपस्थितीत, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांनी पत्रकारांवर जोरदार टीका केली. त्यांनी, छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांचा खरा अर्थ कसा समजून घेतला पाहिजे, यावर भर देत आपले मत मांडले.

कला अकादमीवरून अप्रत्यक्ष टोला

आपल्या भाषणात आमदार गावडे यांनी "एक स्लॅब पडणे आणि संपूर्ण छत कोसळणे यात खूप फरक आहे," असे विधान केले. हे विधान त्यांनी अप्रत्यक्षपणे कला अकादमीच्या नूतनीकरणाच्या वादाकडे निर्देश करत केले. या विधानातून त्यांनी, पत्रकार चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला. छायाचित्रकाराने आपल्या फोटोमधून जे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचा नेमका अर्थ जाणून घेऊन तोच अर्थ लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते.

माध्यमांवर दोषारोप की जबाबदारीतून पळ?

गोविंद गावडे यांच्या या विधानामुळे आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. कला अकादमीच्या वादाची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी, ते केवळ माध्यमांवरच दोषारोप करत आहेत का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

Goa cultural academy controversy
Kala Academy: रंगमंचाचे छप्पर कोसळते, पावसाचे पाणी झिरपते, प्रकाशव्यवस्था- AC बंद पडतो; मग कलाकार 'सुपारीबाज' कसे काय?

त्यांच्या मते, पत्रकारितेचा मूळ उद्देश काहीसा बाजूला सरकत चालला आहे आणि हे योग्य नाही. एका छायाचित्रकाराच्या कलेचा वापर वैयक्तिक स्वार्थासाठी केला जाऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com