MLA Disqualification: आमदार अपात्रता प्रकरण; हायकोर्टाने फेटाळली चोडणकरांची याचिका

न्यायालय सभापतींना कोणताही निर्देश देणार नसल्याचे केले स्पष्ट
Goa High Court | Girish Chodankar | Ramesh Tawadkar
Goa High Court | Girish Chodankar | Ramesh Tawadkar Dainik Gomantak
Published on
Updated on

High Court on Girish Chodankar's petition: गोवा विधानसभेच्या निवडणुकीनंतर काही काळातच गोव्यात काँग्रेसकडून निवडून आलेल्या 8 आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

त्याविरोधात गोवा विधानसभेच्या सभापतींकडे काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांनी या आमदारांना अपात्र ठरवावे, या मागणीची याचिका दाखल केली होती. त्यावर 90 दिवसांत निर्णय घ्यावा, अशी मागणी केली चोडणकर यांनी केली होती.

Goa High Court | Girish Chodankar | Ramesh Tawadkar
Sanquelim Municipal Elections 2023 : साखळीच्या प्रभाग 1, 2 व 4 मध्ये तिरंगी लढती रंगणार

तथापि, त्यावर सभापती रमेश तवडकर यांनी काहीही निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे चोडणकर यांनी मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली होती. चोडणकर यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत न्यायालयाने सभापती तवडकर यांना तसे आदेश द्यावेत, असे म्हटले होते.

याचिका 90 दिवसांत निकाली काढावी, असे आदेश सभापतींना द्यावेत, असे चोडणकर यांनी म्हटले होते.

तथापि, चोडणकर यांची ही याचिकात हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. हायकोर्टाने म्हटले आहे की, ठराविक कालावधीमध्ये याचिका निकाली काढणे सभापतींना बंधनकारक असले तरी त्यांच्यासमोर आमदार अपात्रतेबाबतच्या एकूण 4 याचिका प्रलंबित आहेत. आणि या याचिका सभापती ऐकत आहेत.

Goa High Court | Girish Chodankar | Ramesh Tawadkar
Nagvem-Valpoi: बार मालक, कर्मचाऱ्यांकडून युवकाला मारहाण; कुक, वेटरला अटक, गावकरी संतप्त

त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे आदेश न्यायालय देऊ शकत नाही. किंवा काँग्रेस नेते गिरीश चोडणकर यांच्या याचिकेवर ठराविक कालावधीत निर्णय घेण्याबाबत काहीही निर्देश देऊ शकत नाही. तथापि, चोडणकर यांच्या याचिकेवर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी सभापतींकडून अपेक्षा आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com