Goa WIFI: आमदार दयानंद सोपटे व जीत आरोलकर यांच्यात शीतयुद्ध

Goa WIFI: भर पावसात आमदार सोपटे आणि जीत आरोलकर या दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक वणवा पेट घेत आहे.
Goa WIFI: आमदार दयानंद सोपटे व जीत आरोलकर
Goa WIFI: आमदार दयानंद सोपटे व जीत आरोलकरDainik Gomantak
Published on
Updated on

मोरजी: मान्द्रे पंचायत क्षेत्रातील गरजवंत विधार्थ्याना 24 तास व्हायफाय इन्टरनेट (Goa WIFI Internet) सेवा मगोचे जीत आरोलकर यांनी मोफत 19 रोजी सुरु केली होती त्याचे अज्ञात व्यक्तीकडून केबल कापून टाकल्याच्या घटनेचा निषेध केला, अश्या घाणेरड्या प्रकाराला थारा दिला जाणार नाही, शिवाय आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या भाषेला नियंत्रणात आणावे, हा प्रकार मगो पक्ष कादापीही सहन करणार नाही, असा इशारा मगो पक्षाच्या केंद्रीय समितीचे सदस्य आणि मांद्रेचे माजी सरपंच, विद्यमान पंच राघोबा गावडे यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना दिला. (MLA Dayanand Sopte and Jeet Arolkar had a verbal altercation)

सध्या कोरोनाचा कठीण काळ आहे आणि बाहेर जोरदार पाऊस सुरु असतानाच पाऊसात आमदार सोपटे आणि जीत आरोलकर या दोन्ही नेत्यामध्ये शाब्दिक वणवा पेट घेत आहे. व्हायफाय इन्टरनेट या सेवेचा मुद्दा घेवून सध्या मतदार संघात राजकीय युद्ध मोठ्या प्रमाणात चालू आहे.

Goa WIFI: आमदार दयानंद सोपटे व जीत आरोलकर
Goa: झुआरी उड्डाणपुलाचे लवकरच उद्‍घाटन
Goa WIFI
Goa WIFIDainik Gomantak
Goa WIFI: आमदार दयानंद सोपटे व जीत आरोलकर
Goa: गौळी धनगर समाजा तर्फे भाजप सरकारच्या कार्याचे स्वागत

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी 19 रोजी सर्वात प्रथम मांद्रे पंचायत सभागृहात मांद्रे पंचायत क्षेत्रातील विधार्थ्याना तब्बल 24 तास मोफत व्हायफाय सेवा सुरु केली. आणि इन्टरनेट केबल सेवा देण्याचे कंत्राट स्थानिक भूमिपुत्रालाच दिले. त्याच्या दुसऱ्या दिवशी 20-रोजी आमदार दयानंद सोपटे यांनी पार्से पंचायत क्षेत्रातील गरजू विधार्थ्याना पंचायत सभागृहात दिवसाचे दोन तास इन्टरनेट मोफत सेवेचा शुभारंभ केला ,आणि त्याचे कंत्राट तालुक्या बाहेरच्या व्यावसीकाला दिले . या दोन विषयावरून सध्या दोघांमध्ये बरेच वाद सुरु आहेत .

जीत आरोलकर यांनी मांद्रे मध्ये चालू केलेल्या व्हायफायचे सर्व केबल भाऊसाहेब बांदोडकर पुतळ्याजवलील कुणीतरी कापून टाकले . त्या घटनेचा माजी सरपंच राघोबा गावडे यांनी निषेध केला.

Goa WIFI
Goa WIFIDainik Gomantak

Goa WIFIमाजी सरपंच राघोबा गावडे यांनी माहिती देताना 19 रोजी गरजू विधार्थ्यांची गरज लक्षात घेवून सर्वात प्रथम व्हायफाय सुरु केली , त्यावेळी जीत आरोलकर यांनी आपल्या भाषणात हि सुविधा सरकारने सुरु करायला हवी होती असा उल्लेख केला त्यांनी आमदार सोपटे यांच्या नावाचाउल्लेख सुद्धा न करता किंवा आमदार सोपटे यांच्यावर टीकाही न करता आमदार सोपटे यांनी पार्से येथे आपल्या कार्यक्रमात जीत आरोलकर यांच्यावर खालच्या पातळीवर जावून टीका केली आहे . ती अयोग्य आहे , त्याविषयी सर्वत्र व्हीडीवो व्हायरल झाला आहे . जनतेची दिशाभूल करून आमदार सोपटे यांनी भलतीच वक्तव्य करू नये असे आवाहन राघोबा गावडे यांनी दिले आहे.

Goa WIFI: आमदार दयानंद सोपटे व जीत आरोलकर
Goa Elections: काँग्रेसने युतीसंदर्भात निर्णय घ्यावा, विजय सरदेसाईंचे वक्तव्य
Goa WIFI
Goa WIFIDainik Gomantak

मग आमदार प्रसिद्धी घेत नाही का ?

आमदार सोपटे यांच्या म्हणण्यानुसार ते कधीही मताची गणिते करत नाही का , ज्या योजना लोकाना मिळवून देतात त्यावेळी ते किंवा त्याचे जे समर्थक व्यासपीठावर असतात तेव्हा भाषण देताना आमदार सोपटे याना परत संधी द्यावे भरघोस मतांनी विजयी करावे अशे वक्तव्य मग का केली जातात . ती मतांची गणिते नव्हे का , जीत आरोलकर यांनी २४ तास इन्टरनेट सेवा सुरु केली त्यासाठी प्रसार मध्यामाना निमंत्रित केले . त्याची माहिती लोकापर्यत पोचावी म्हणून ,तर मग आमदार सोपटे यांनी 2 तासासाठी इन्टरनेट सेवा कार्यरत केली तेव्हा प्रसारध्यामाना बोलावून प्रसिद्धी केली नाही का असा प्रश्न राघोबा गावडे यांनी उपस्थित केला .

आमदार सोपटे यांचा सध्या तोल ढासळल्या सारखे बोलत सुटतात आहे , आमदार सोपटे यांनी मगो पक्षाच्या नेत्यावर विनाकारण टीका करू नये , ती टीका या पुढे त्यांनी बंद करावी असा इशारा दिला . आमदारांनी पूर्ण मतदार संघात जावून रस्त्याची , वीज पाणी याची काय स्थिती आहे ती पहावी व ती सोडवण्याचा प्रयत्न करावा , विधार्थ्यांच्या समस्यांवर त्यांनी राजकारण करू नये ,बेकायदा रस्ते फोडणाऱ्याना पाठींबा देणाऱ्या आमदाराकडून आणखी काय अपेक्षा ठेवावी असा प्रश्न उपस्थित करून जो कोणी गरजवंतला मदत करतात त्यांचे स्वागत अभिनंदन करण्याऐवजी त्यांच्यावर टीका करणे हे आमदार सोपटे याना शोभत नाही असे सल्ला गावडे यांनी दिला . सध्या कोरोना काळात संघटीत होऊन गरवन्तना मदत करण्याची गरज असताना एक मेकावर विनाकारण टिका करणे आमदार सोपटे यांनी बंद करावे असे आवाहन केले .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com