Khariwada Jetty: खारीवाडा जेटीची तात्काळ दुरुस्ती करा! आमदार साळकर

Daji Salkar: जलस्त्रोत विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खारीवाडा मच्छिमारी जेटीची संयुक्तरित्या पाहणी करून ताबडतोब दुरुस्ती करण्याचा आदेश
Daji Salkar: जलस्त्रोत विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खारीवाडा मच्छिमारी जेटीची संयुक्तरित्या पाहणी करून ताबडतोब दुरुस्ती करण्याचा आदेश
Khariwada Jetty, Daji SalkarDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: वास्कोचे आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांनी जलस्त्रोत विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खारीवाडा मच्छिमारी जेटीची संयुक्तरित्या पाहणी करून दुर्दशा असलेल्या जेटीची ताबडतोब दुरुस्ती करण्याचा आदेश दिला. उद्या बुधवारपासून जेटीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल, असे जलस्त्रोत खात्यातर्फे सांगण्यात आले.जेटीसंबंधी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मच्छिमारी संघटनेकडून मागणी.

वास्कोतील खारीवाडा येथील मच्छिमारी जेटीची दयनीय स्थिती झाली असून या जेटीवरून चालणेही धोक्याचे बनले आहे. कारण या जेटीचे लोखंडी प्लेट्स गंजून तुकडे पडले आहेत. तसेच या जेटीला केव्हाही जलसमाधी मिळू शकते. दहा वर्षापूर्वी या जेटीची डागडुजी केली होती. तद्नंतर या जेटीकडे सरकारने ढुंकूनही पाहिले नसल्याचे सांगण्यात आले.

गोवा मच्छिमार बोट मालक संघटनेचे अध्यक्ष फिलिप डिसोझा यांनी सांगितले की, आपण सरकारकडे कित्येक वर्षे पाठपुरावा करत आहे. मात्र खारीवाडा जेटीकडे सरकारने दुर्लक्ष केले आहे. मालीम, बेतूल सारख्या जेटीचे सरकारने नूतनीकरण केले. तसेच वास्को खारीवाडा जेटीचे नूतनीकरण करण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली.

कारण खारीवाडा जेटीवरून २५० हून अधिक मासेमारी ट्रॉलर कार्यान्वित आहेत. पूर्ण जेटीची दुरवस्था झाल्याने आम्ही ट्रॉलर नांगरून ठेवू शकत नाही. कारण पाण्याच्या प्रवाहात ट्रॉलर जेटीवर आदळून आम्हाला नुकसानीला सामोरे जावे लागते, असे ते म्हणाले.

दरम्यान, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी जलस्त्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांसमवेत जीर्ण झालेल्या खारीवाडा जेटीची संयुक्त पाहणी केली व जेटीचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. मासेमारीच्या हंगामापूर्वी तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश दिल्याबद्दल जोस फिलिप डिसोझा यांनी साळकर यांचे आभार मानले.

तसेच खारीवाडा येथील मच्छिमारांना कायमस्वरूपी जेटी देण्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडे मुद्दा मांडण्याची विनंती साळकर यांना केली.मच्छिमारी समुदायाच्या सदस्यांनी आमदार कृष्णा साळकर यांच्या जलद प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जेटीसंबंधी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली.

Daji Salkar: जलस्त्रोत विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत खारीवाडा मच्छिमारी जेटीची संयुक्तरित्या पाहणी करून ताबडतोब दुरुस्ती करण्याचा आदेश
Dona Paula Jetty: प्रश्‍न सोडवा अन्यथा धरणे आंदोलन करू; विक्रेत्यांचा इशारा

जेटी दुरुस्तीला मुख्यमंत्र्यांकडून मंजुरी!

आमदार दाजी साळकर यांनी सांगितले की, जेटीची समस्या फार जुनी असून माजी मंत्री फिलीप डिसोझा याविषयी पाठपुरावा करत होते.त्यानुसार आज जलस्त्रोत विभाग अधिकारी आणि कंत्राटदारांसोबत खारेवाडा फिशिंग जेटीची पाहणी केली आहे. मी हा विषय चालू अधिवेशनात मांडला होता आणि जेटी दुरुस्तीचे काम हाती घेण्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार जेटीची आज पाहणी करून कंत्राटदाराला उद्यापर्यंत दुरुस्ती सुरू करण्याचे आणि मासेमारीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com