वेळ्ळीसाठी आमदार क्रुझ सिल्वांनी केला 'हा' निर्धार

सावियो डिसिल्वा यांचा 118 मतांनी सिल्वांनी पराभव केला व आमदारकीचा मान मिळवला
MLA Cruz Silva decides Smart City for Velim
MLA Cruz Silva decides Smart City for VelimDainik Gomantak
Published on
Updated on

सासष्टी : यापुर्वीच्या एकाही आमदाराने वेळ्ळी मतदारसंघाचा विकास केला नाही. 2017 पासून आपण आम आदमी पक्षात आहे. व या पक्षाची ध्येय धोरणे स्थानिकांना पटवून देण्यास मी य़शस्वी ठरलो म्हणूनच या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येऊ शकलो. विकास म्हणजे काय हे मी वेळ्ळीला स्मार्ट गावचा दर्जा मिळवून देऊन सर्व गोमंतकीयांना दाखवणार आहे व हा यंदाचमाझा निर्धार असल्याचे वेळ्ळीचे आम आदमी पक्षाचे (AAP) आमदार क्रुझ सिल्वा यांनी पत्रकारांना सांगितले.

MLA Cruz Silva decides Smart City for Velim
गोव्याच्या जलतरणपटू संजना प्रभुगावकरची भारतीय संघात निवड

या गावात सर्व प्रकारच्या मूलभुत सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येतील. स्थानिक संस्कृती जपूनच या गावचा विकास साधला जाईल असेही आमदार सिल्वा यांनी सांगितले.
यंदाच्या निव़णुकीत क्रुझ सिल्वाने कॉंग्रेसचा (Congress) उमेदवार सावियो डिसिल्वा यांचा 118 मतांनी पराभव केला व आमदारकीचा मान मिळवला.

मी विधानसभेत (Assembly) केवळ आमदार म्हणून बसणार नसून माझ्या मतदारसंघातील लोकांचा व सर्वार्थाने गोमंतकीयांचा आवाज बनणार आहे. वेळ्ळी गावात शैक्षणिक, आरोग्य सेवांमध्ये आमुलाग्र बदल केले जातील. कौशल्य शिक्षणावर भर दिला जाईल. आम आदमी पक्षाने ज्या पद्धतीच्या शाळा नवी दिल्लीत बनवल्या आहेत, तशाच वेळ्ळीत सुरु केल्या जातील असेही सिल्वा यांनी सांगितले. येथील आरोग्य केंद्र आद्यावत सर्व सुविधा युक्त केले जाईल. चोवीसही तास डॉक्टर उपलब्ध असतील अशी सोय केली जाईल असेही आमदार (MLA) सिल्वा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com