आमदार क्लाफास डायस यांची भाजपा उमेदवारी पक्की फोडला प्रचाराचा नारळ!

कुंकळळीचे आराध्य दैवत श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण संस्थानात नारळ अर्पण करून डायस यांनी देवीचे आशीर्वाद घेतले.
Bharatiya Janata Party
Bharatiya Janata PartyDainik Gomantak
Published on
Updated on

कुंकळळी : कुंकळळीचे विद्यमान आमदार क्लाफास डायस यांना भारतीय जनता पक्षाची (Bharatiya Janata Party) उमेदवारी कुंकळळी मतदारसंघात नक्की झाली असून काल रविवारी क्लाफासने भाजपा कार्यकर्ते आणि आपल्या समर्थकांसह प्रचाराचा नारळ फोडला आहे. यावेळी भाजपा कुंकळळी मतदारसंघचे मंडळ अध्यक्ष मारुती देसाई व कार्यकर्ते तसेच भाजपा नगरसेवक, जिल्हा पंचायत सदस्या, सरपंच व पंच सदस्य उपस्थित होते.

Bharatiya Janata Party
गिरीश चोडणकर हे निष्कलंक व्यक्तिमत्त्व; नारायण रेडकर

कुंकळळीचे आराध्य दैवत श्री शांतादुर्गा कुंकळळीकरीण संस्थानात नारळ अर्पण करून डायस यांनी देवीचे आशीर्वाद घेतले. कुंकळळीतील अवर लेडी ऑफ हेल्थ चर्चीत जाऊन साऊद सायबिणीचे आशीर्वाद घेतले. डायस यांनी आजोबा देव व इतर धार्मिक संस्थानात भेट देऊन निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी देव देवतां कडून वर मागितला.

यावेळी बोलताना डायस यांनी सांगितले की सोमवार पासून ते व भाजपा टीम घरोघरी मतदारांना भेटी देणार आहेत. भाजपा सरकारने केलेल्या विकासाच्या बळावर व आपण आमदार म्हणून केलेल्या कार्याच्या बळावर मतदार आपल्याला सेवा करण्याची आणखी एक संधी देणार असा आत्मविश्वास डायस यांनी व्यक्त केला. कुंकळळी पालिका क्षेत्रातून घरोघरी प्रचारास सुरवात करण्यात येणार असून नंतर बाळळी, आंबावली, सारजोरा, माकाझांन ,परोडा,गिरदोली व चांदर पंचायत क्षेत्रात घरोघरी प्रचार केला जाणार असल्याचे डायस यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Forward Suspends Alliance Talks
Swiggy Rs 93 Lakh Theft
Jaigad Shipbuilding Project
Heavy Rain, Yellow Alert In Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com