Politics: गोव्यातील (Goa) काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हे निष्कलंक व स्वच्छ चरित्राचे व्यक्तिमत्त्व असून शिक्षकी पेशा सांभाळताना पक्षाचे कार्य योग्य पध्दतीने करीत आहेत.अश्या व्यक्तींवर नाहक आरोप करून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे,त्यामुळे भाजप मंडळाच्या विधानाचा निषेध असल्याचे मांद्रे काँग्रेस गट समिती अध्यक्ष नारायण रेडकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
भाजप (BJP) मंडळाने केलेला आरोप खोडून काढताना, मोले चेकपोस्टवर टॅक्स वसुली बाबतचा आरोप तथ्यहीन असून भाजपने सरकारी यंत्रणा राबवून चौकशी करावी व आरोप सिद्ध करावा असे आवाहन केले.भाजप मंडळाने विनाकारण व नाहक आरोप करू नयेत असा इशारा रेडकर यानी दिला. मांद्रे मतदारसंघात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत,मतदार नाराज आहेत त्यांचे लक्ष विचलित करण्याचे प्रयत्न पद्धतशीरपणे भाजप मंडळाने केल्याचा आरोप गट अध्यक्ष रेडकर यांनी केला.माजी मुख्यमंत्री पार्सेेेकर यांच्या काळातील केरी तेरेखोल पुलाचे काम मार्ग्गी् का लागले नाही,तेरेखोल
नदिखालुन वीज केबल नेण्याच्या भूमीपूजनाचे काम कुठे अडकले,जुनसवाडा केबल स्टेड पूल,तुये इलेक्ट्रॉनिक सिटी,तुये हॉस्पिटलचे अर्धवट स्थितीत उदघाटनाची घाई का केली. डायलिसीस युनिट सुरू करण्यामागे जाहीरनाम्यातुन श्रेय घेण्याचा प्रयत्न केला का,असा सवाल रेडकर यानी केला.डोंगर माळरानावर बंगले- घरे उभारली जातात,त्यांना परवाने मिळतात,मात्र तुये इलेक्ट्रॉनिक सिटी पूर्ण करण्यासाठी व बेरोजगार युवकांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नी आवाज उठविला असता,तर खूप बरे झाले असते,नाहक काँग्रेस अध्यक्षावर आरोप करणे बंद करण्याचा इशारा, गट अध्यक्ष रेडकर यांनी दिला.
अलीकडे मांद्रे देवस्थानच्या प्रांगणात उदघाटन कार्यक्रमात आमदार सोपटे यांनी महामंडळमार्फत व सरकारकडून अंदाजे 300 कोटींची विकासकामे केल्याचे सांगितले. प्रत्यक्षात आमदार सोपटे यांनी प्रत्येक पंचायत क्षेत्रांत किती कोटी रुपये खर्च केले व कामाची सविस्तर यादी जनतेला द्यावी,अशी मागणी रेडकर यांनी केली आहे.
सध्या कोविडच्या नवीन विषाणूची काळजी लागून राहिली आहे,सरकारने सध्या काय -काय उपाययोजना केली की, सामान्य नागरिकांनी मृत्युमुखी पडावे असा सवाल आहे. विकास केल्याची वलग्ना आमदार करीत आहेत,मात्र नेमका कसला विकास केला हे शोधावे लागेल,असा टोमणा मारला.अद्यापही मतदारसंघातील रस्ते,वीज व पाणी समस्या चिंताजनक असून लोक न्याय मागताना दिसतो, त्याबाबत भाजप मंडळाने आवाज उठवायला हवा,असे रेडकर यांनी सांगितले. मतदारांच्या डोळ्यात धूळफेक न करता भाजपने अपूर्ण विकासकामे पूर्ण करण्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सदस्य विष्णू केरीकर यांनीबोलताना सांगितले की, भाजप मंडळाने गिरीश चोडणकर यांच्या पक्षनिष्ठेबद्दल शंका घेऊ नये.भाजपच्या व्यक्तिनिष्ठ पदाधिकाऱ्यांनी पक्षनिष्ठेबद्दल बोलून सवंग प्रसिद्धी घेऊ नये.आमदाराकडून रखडलेली कामे करून घ्यायला हवीत विधायक कामे पूर्ण करण्यासाठी शक्ती खर्ची घालावी असे केरीकर यांनी सांगितले.तुये कामुर्ली फेरीपर्यतच्या रस्त्याची दुरवस्था व तुये कामुर्ली पुलाचा प्रश्न भाजपने दूर केला असता तर खूपच चांगले झाले असते, त्याकामी भाजप पदाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे असे केरीकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत सेवादल अध्यक्ष अरुण वस्त व जिल्हा समितीचे सदस्य मिंगेल फेर्नांडिस उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.