भ्रष्टाचाराच्या आरोपातून चर्चिल आलेमाव निर्दोष मुक्त

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा (Sessions Judge Vincent DeSilva) यांनी आरोप निश्चित करण्यापूर्वीच निर्दोष मुक्त केले.
Churchill Alemao
Churchill AlemaoDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: वित्त खात्याची परवानगी न घेता कोट्यवधी रुपयांची कामे परस्पर करवून घेऊन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपातून सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) आणि तत्कालीन अधीक्षक अभियंता पुंडलिक पारकर (Pundalik Parkar) यांना दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्हिन्सेंट डिसिल्वा (Sessions Judge Vincent DeSilva) यांनी आरोप निश्चित करण्यापूर्वीच निर्दोष मुक्त केले.

वित्त खात्याला डावलून चर्चिल आणि पारकर यांनी संगनमत करून कोट्यवधीचा घोटाळा केल्याचा आरोप या दोघांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक खात्याने ठेवला होता. या प्रकरणी मूळ तक्रार काँग्रेसच्या विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष सुनील कवठणकर यांनी केली होती. चर्चिल काँग्रेस सरकारात मंत्री असताना त्यांनी हा घोटाळा केल्याचा हा आरोप होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी त्यावर मोठा गदारोळ माजविला होता.

Churchill Alemao
आपच्या रोजगार यात्रेत मीडिया प्रतिनिधींवर हल्ला

मात्र या प्रकरणी पैशाचा व्यवहार झाला असा एकही पुरावा पोलिस पुढे आणू शकले नाहीत. एवढेच नव्हे तर ही कंत्राटे पात्र कंत्राटदारांनाच देण्यात आली होती हे आलेमाव यांचे वकील कार्लोस आल्वारीस यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने हा मुद्दा ग्राह्य मानताना दोघांनाही निर्दोष मुक्त केले. पोलिसांच्या वतीने सरकारी वकील एस. सामंत यांनी तर आलेमाव याच्या वतीने ऍड. आल्वारीस तर पारकर यांच्या वतीने ऍड. शंकर हेगडे यांनी बाजू मांडली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com