Goa Assembly Monsoon Session 2024: भंगारअड्ड्यांबाबत सरकारचा 'मास्टर प्लान' तयार, विधानसभेत मंत्र्यांनी दिले संकेत

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: भंगारअड्ड्यांसाठी विशिष्ट धोरण असणे गरजेचे तसेच लोकवस्तीपासून भंगारअड्डे दूर असावेत असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले
Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: भंगारअड्ड्यांसाठी विशिष्ट धोरण असणे गरजेचे तसेच लोकवस्तीपासून भंगारअड्डे दूर असावेत असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले
MLA Chandrakant ShetyeDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यातील नागरिकांचे आरोग्य आणि सुरक्षेचा विचार करता राज्यातील भंगारअड्ड्यांसाठी विशिष्ट धोरण असणे गरजेचे आहे. लोकवस्तीपासून भंगारअड्डे दूर असावेत, असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले. ते भंगारअड्ड्यांविषयी मांडलेल्या खासगी ठरावावेळी बोलत होते.

त्यावर राज्यातील भंगारअड्ड्यांविषयी धोरण आणण्याच्या अनुषंगाने सरकार योग्य ती पावले उचलत आहेत. यासाठी वेळ लागेलही; परंतु येत्या १५ ऑगस्टपूर्वी राज्यातील सर्व भंगारअड्ड्यांची नोंदणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.

डॉ. शेट्ये म्हणाले, भंगारअड्ड्यांविषयी विशिष्ट धोरण अवलंबिणे हे पर्यावरण, सुरक्षा तसेच इतर अनेक कारणांसाठी गरजेचे आहे. भंगारअड्डे धारकांना ९० दिवस नोंदणीसाठी दिले जातील, असे महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले.

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: भंगारअड्ड्यांसाठी विशिष्ट धोरण असणे गरजेचे तसेच लोकवस्तीपासून भंगारअड्डे दूर असावेत असे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सांगितले
Goa Assembly Monsoon Session 2024: मच्छीमारांना इंधनावर व्हॅट सवलत, प्रलंबित अनुदानावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा; मंत्री हळर्णकर

लोकवस्तीत परवानगी नको

भंगारअड्ड्यांना सरकारने लोकवस्तीत परवानगी देऊ नये त्याचे घातक परिणाम आम्ही बामणभाटात घडलेल्या घटनेत पाहिले आहेत. काहीजण घातक गॅस आणून ठेवतात. अशा अड्ड्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. बामणभाटमधील अड्ड्यांत क्लोरिनगॅस पसरल्याने नागरिकांवर त्याचा परिणाम झाला. त्या भागातील झाडांची पानेदेखील वाळली. त्यामुळे अशा प्रकारांबाबत योग्य ती काळजी घेणे गरजेचे असल्याचे आमदार रुडाल्फ फर्नांडिस यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com