वास्को: कुठ्ठाळीचे आमदार अंतोनियो वाझ (MLA Antonio Vas ) यांनी आज वेळसाव पंचांसोबत रेल्वे दुहेरी ट्रॅकिंगची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांची भेट घेत त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. यावेळी पोलिस निरीक्षक डायगो ग्रेसियास, रेल्वे अधिकारी देखील उपस्थित होते.
(MLA Antonio Vaz has assured to resolve the issue of double tracking soon)
यावेळी बोलताना आमदार वाझ यांनी "दुहेरी ट्रॅकिंग विषयी समस्या समजून घेण्यासाठी मी येथे आलो आहे. माझ्या लक्षात आले आहे की, पारंपारिक घरांपर्यंत पोहोचण्याचे रस्ते, घरांच्या शेजारी प्रस्तावित ट्रॅक आणि इतर समस्या आहेत.
हे लोकांचे प्रश्न आम्ही उपजिल्हाधिकार्यांसमोर पुढच्या आठवड्यात वेळसाव पंचायत, स्थानिक आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या होणार असलेल्या बैठकीमध्ये मांडणार आहोत. मी या बैठकीत लोकांच्या तक्रारी आणि समस्या जाणून घेईन. असे ते म्हणाले.
सामाजिक कार्यकर्ते रोकेझिन्हो डिसोझा म्हणाले की, लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला, परंतु कोणीही समस्यांकडे लक्ष देत नाही."आम्ही खूप आवाज उठविला पण काही एक उपयोग झाला नाही. लोक वास्तविक समस्यांबद्दल बोलले मात्र कोणत्याही समस्येचे निराकरण होत नाही.
आम्ही आता आमचे आमदार अंतोनियो वाझ यांना येथे बोलावले आहे. आणि त्यांनी आम्हाला आमच्या समस्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले आहे. आणि आता आम्हाला आशा आहे की आमच्या समस्या आणि तक्रारींचे निराकरण केले जाईल, ”डिसोझा म्हणाले.
दरम्यान, आरव्हीएनएलचे प्रभारी सदाशिवन म्हणाले की, दुहेरी ट्रॅकिंग सुरू असताना रेल्वे लोकांचे म्हणणे ऐकून त्यावर तोडगा काढण्यासाठी तयार आहे, "आजपर्यंत एकाही व्यक्तीने लोकांच्या समस्या घेऊन रेल्वेकडे संपर्क साधला नाही आणि ते येऊन फक्त आम्हाला कामे थांबवण्यासाठी सांगतात. आमदारांनी आता उपजिल्हाधिकारी व स्थानिकांसह वेळसाव पंचायत सदस्यांसह संयुक्त बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.