Goa Water Problem: डिचोली येथे पाणीटंचाई कायम; तर मुळगावात पाण्याची नासाडी

प्रशासनाने तातडीने पाण्याचा प्रश्न सोडवण्याची नागरिकांनी केली मागणी
Water scarcity
Water scarcityDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली येथे गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईने नागरिक हैराण झाले आहेत. सध्या डिचोली भागातील अनेक वाड्यांवर नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत असल्याचे चित्र आहे. याबरोबर मुळगावमध्येही गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. तर त्याच मुळगावमध्ये काही वाटारावर पिण्याचे पाणी नागरिकांना मिळत नसल्याचं नागरिकांनी म्हटलं आहे.

(Water scarcity at bicholim and continuous water wastage at Mulgao)

Water scarcity
आमदार गावकर 'श्रीलंकेत' पडले आजारी, प्रकृतीबाबत वाचा Health Update

याबाबत बोलताना मुळगाव येथील एका नागरिकाने सांगितले की, मुळगाव येथे ओहळात पाण्याचा पाईप फुटला आहे. त्यामूळे गेल्या सात-आठ महिन्यांपासून हजारो लिटर पाणी वाया जात आहे. याचा परिणाम म्हणून नागरिकांना पाणी आवश्यक त्या प्रमाणात मिळत नाही. त्यामूळे नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

Water scarcity
Goa Football Association: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या अध्यक्षपदी कायतान फर्नांडिस

पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा

या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देत मुळगांव येथील पाण्याचा प्रश्न सोडवावा. कारण पाण्याअभावी वयोवृद्ध नागरिकांना ही फिरावे लागत असल्याची खंत काही नागरिकांनी माध्यमांकडे व्यक्त केली आहे. त्यामूळे प्रशासन या प्रश्नाकडे लक्ष देणार का? की नागरिकांना पाण्यासाठी फिरावे लागणार हे पाहावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com