Sancoale: सांकवाळ फेस्त तयारीला वेग; आमदार आंतोनियो वास यांनी घेतली आढावा बैठक

16 जानेवारी रोजी साजरा होणारा सांकवाळ येथे फेस्त
MLA Antonio Vaz
MLA Antonio VazDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: 16 जानेवारी 2023 रोजी साजरा होणा-या सेंट जोसेफ वाझच्या नोव्हेनास आणि फेस्तचे समन्वय आणि उत्तम आयोजन करण्यासाठी कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांनी त्यांच्या कार्यालयात सरकारी अधिका-यांची बैठक घेऊन कायदा सुव्यवस्थेविषयी चर्चा करण्यात आली. (MLA Antonio Vaz discuss with government officials about sancoale feast)

MLA Antonio Vaz
Margao: मडगाव फेस्ताची फेरी सात दिवसावर; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गोवा फॉरवर्डने सुचवला 'हा' पर्याय

सांकवाळ येथील चर्चमध्ये सेंट जोसेफ वाझ यांचे 16 जानेवारी 2023 साज-या होणा-या फेसाची पूर्वतयारी म्हणून आज कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास यांनी विविध सरकारी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आपल्या कार्यालयात बोलावून कायदा सुव्यवस्था विषयावर चर्चा करण्यात आली. जानेवारी 2013 पासून नोव्हेनाला सुरुवात होणार असून नंतर 16 जानेवारी रोजी फेस्त साजरे होणार आहे. या काळात भाविकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासू नये तसेच कायदा सुव्यवस्थे विषयी कमतरता भासू नये याविषयी सरकारी अधिकाऱ्यांना आमदार वास यांनी सूचना दिल्या.

याविषयी बोलताना आमदार आंतोनियो वास यांनी सेंट जोसेफ वाझ यांच्या नोव्हेना व फेस्त जानेवारी महिन्यात होत असून नोव्हेना व फेस काळात भाविकांना कोणत्याच प्रकारचा त्रास होणार नाही, तसेच हे फेस्त भक्तीपूर्ण वातावरणात साजरे व्हावे अशी इच्छा मनात बाळगून आजची बैठक बोलावण्यात आली होती. याकाळात कायदा सुव्यवस्थेविषयी कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्यास सरकारी अधिका-यांना दिली असल्याचे ते म्हणाले.

MLA Antonio Vaz
Canacona Lokotsav: काणकोण लोकोत्सवाला राष्ट्रपती राहणार गैरहजर; सभापती तवडकरांनी सांगितले 'हे' कारण

बैठकीला मुरगाव तालुका पोलिस उपअधिक्षक सलिम शेख, उपजिल्हाधिकारी रवीशेखर निपाणीकर, वर्णा पोलिस निरीक्षक डायगो ग्रेसियस, वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, सार्वजनिक बांधकाम खाते, अग्निशामक दलाचे अधिकारी तसेच चर्चचे धर्मगुरू का. मान्यूयल, फा. केनेथ व इतर सरकारी अधिकारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com