Margao: मडगाव फेस्ताची फेरी सात दिवसावर; वाहतूक कोंडी टाळण्यासाठी गोवा फॉरवर्डने सुचवला 'हा' पर्याय

8 डिसेंबर पासून फेरी होणार सुरु
Margao
MargaoDainik Gomantak
Published on
Updated on

फातोर्डा: मडगाव फेस्ताची फेरी सात दिवस करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे. ही फेरी 8 डिसेंबर पासून सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज बैठक पार पडली. या बैठकीस आमदार दिगंबर कामत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

(Margao Holy Spirit feast will start from 8th December)

Margao
IMD Goa: थंडीचा कडाका वाढला; 'हे' दोन दिवस गोव्यात पावसाची शक्यता

या बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार फातोर्डा येथील जुन्या मार्केटमध्ये होली स्पिरीट चर्चच्या फेस्तसाठी वाहतूक व्यवस्था चोख व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याची माहिती मडगावचे नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी दिली.

या बैठकीदरम्यान रस्ता वाहतूक सुरळीत होण्याकरिता वाहतूक पोलिसांना नेमण्यात येणार आहे. तसेच वाहन पार्किंगसाठी चार जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तसेच फेस्त दरम्यान उभारण्यात येणारी दुकाने नाल्याच्या आतील बाजूला उभारण्यात येणार आहे. त्यामुळे येथील रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत राहणार असल्याचे वाहतूक पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Margao
Canacona Lokotsav: काणकोण लोकोत्सवाला राष्ट्रपती राहणार गैरहजर; सभापती तवडकरांनी सांगितले 'हे' कारण

यावेळी गोवा फॉरवर्डने इशारा देत फेस्त फेरी दुसरीकडे हलविली नाही तर कदंब बस स्थानक रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरीकांना समस्यांना सामोरे जावे लागेल. त्यामुळे याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांना घ्यावी असे म्हटले आहे.

गोवा फॉर्वर्ड पक्षाचे नेते दुर्गादास कामत यांनी सांगितले की, येथील रस्त्यावर मल्लनिसरण प्रकल्पाचे काम सुरु असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून ट्राफिक पोलिसांना ही फेरी अन्य ठिकाणी हलविण्याची सूचना केली होती. त्यांची ही मागणी धुडकावून लावण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com