Goa Electricity Dept: वीज खात्याची बिलं ऑनलाईन भरताय थांबा, चार दिवस संकेतस्थळ राहणार बंद

वीज खात्याची माहिती जाणार क्लाऊडवर
Goa Electricity Department
Goa Electricity DepartmentDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Electricity Department: गोवा विद्युत खात्याने एक महत्वाची सुचना राज्यातील नागरिकांसाठी जारी केली आहे. वीज खात्याचे संकेतस्थळ चार दिवसांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी याकाळात ऑनलाईन शुल्क भरणा करू नये अशी सुचना खात्याच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत वीज खात्याच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. वीज खात्याचे संकेतस्थळावरील डेटा आणि अर्जाची माहिती क्लाऊड वरती स्थलांतरीत केली जाणार आहे. त्यामुळे 07 ते 10 एप्रिल या कालावधीत संकेतस्थळ सर्व प्रकारच्या ऑनलाईन शुल्क भरणा करण्यासाठी बंद राहणार आहे. असे वीज खात्याने म्हटले आहे.

सात एप्रिल (उशीरा रात्री) ते 10 एप्रिल सकाळी सहा वाजेपर्यंत संकेतस्थळ बंद राहणार आहे. असे खात्याने म्हटले आहे. ग्राहकांनी याची नोंद घेऊन या काळात कोणत्याही प्रकारचा भरणा करण्यासाठी संकेतस्थाचा वापर टाळावा असे वीज खात्याने म्हटले आहे.

वीज खात्याची माहिती जाणार क्लाऊडवर

गोवा वीज खात्याची सर्व माहिती आणि महत्वाचे दस्तऐवज क्लाऊडवरती स्थलांतरीत केले जाणार आहेत. त्यामुळे चार दिवसांसाठी खात्याचे संकेतस्थळ शुल्का भरणा करण्यासाठी बंद ठेवली जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim elevated road traffic
Bicholim Gas Agency Online Payment Stopped
Goa Rainfall Deficit 2026
Banks Closed for Five Days
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com