Ponda: रस्ताकामाची फाईल गायब! सरकारी कामात लुडबूड कुणाची? रवी नाईक संतप्त; संबंधितांचा शोध लावण्याचा आदेश देणार

Ravi Naik Ponda Politics: सरकारी कामात लुडबूड कोण? त्यांना हुडकून काढण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात येणार आहेत, असे रवी नाईक म्हणाले.
Ravi Naik
Ravi NaikDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: कुर्टी ते आपेव्हाळपर्यंतच्या हॉटमिक्सिंग रस्ता कामाची फाईल मुद्दामहून गहाळ करण्याचा प्रकार म्हणजे सरकारची अपकीर्ती करण्याचा प्रकार असून झारीतील या सरकारची बदनामी होत आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचा आदेश देण्यात येणार असल्याचे फोंडा मतदारसंघाचे आमदार तथा कृषीमंत्री रवी नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

फोंडा मतदारसंघातील सर्व रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येत असून बहुतांश रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे उर्वरीत रस्त्याचे काम सुरु असून फोंडावासीयांना जे चांगले ते देण्याचा आपण सामत्याने प्रयत्न केला आहे.

Ravi Naik
Ponda Fish Market: आधी जागा निश्चित करा, मग आम्हाला हटवा! फोंडा मासळी मार्केटमधील विक्रेत्यांची मागणी; नगराध्यक्ष करणार मध्यस्थी

तरीपण काही नतद्रष्टां कडून अशा कामांना छुपा विरोध केला जात असून हा विरोध मोडून ही कामे पूर्णत्वास जात आहेत. मतदारांच्या विश्वासाच्या बळावर फोंडा मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट केला जात आहे . फोंड्यातील भूमिगत केबल व इतर कामांमुळे रस्ता हॉटमिक्स काम रखडले होते ते काम पूर्ण होऊन रस्ता हॉटमिक्स कामाला प्रारंभ झाला आहे.

Ravi Naik
Ponda Municipality: 15 नळ कनेक्शन तोडले, 1600 आस्थापनांना बजावली नोटीस; गटारात सांडपाणी सोडणाऱ्यांना फोंडा पालिकेचा दणका

...लुडबूड करणारे कोण?

कुर्टी - फोंड्यातील मारुती शोरूम ते आपेव्हाळ व इतर रस्त्याच्या कामाची फाईल करण्यात आली. त्याला मंजुरी घेण्यात आली, पण ही फाईलच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयातून गायब झाली. त्यामुळे हे काम रखडले, पण आता सद्यस्थितीत हे काम सुरू करण्यात आले आहे. सरकारी कामात लुडबूड कोण? त्यांना हुडकून काढण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात येणार आहेत, असे रवी नाईक म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com