Margao Municipality: चोरी की केवळ गैरसमज? मडगाव पालिकेच्या 'त्या' गायब झुंबरांचं गूढ उकललं! चोरीला गेली नसून पालिकेच्या आवारात सुरक्षित

Margao Municipality Chandeliers: मडगाव पालिकेची संशयास्पदरित्या गहाळ झालेली दोन झुंबरे अखेर पालिकेच्या आवारातच सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
Margao Municipality Chandeliers
Margao MunicipalityDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव:  मडगाव पालिकेची संशयास्पदरित्या गहाळ झालेली दोन झुंबरे अखेर पालिकेच्या आवारातच सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना मडगाव पालिकेचे प्रशासक श्रीनेत कोठवाळे यांनी सांगितले की, हे झुंबर चोरीला गेलेले नसून ते दुरुस्तीसाठी काढण्यात आली होती.

त्यामुळे आता या झुंबर गहाळ प्रकरणाला पूर्णविराम मिळाला आहे. कोठवाळे यांनी आज पत्रकारांना याबाबत सविस्तर माहिती दिली. मडगाव पालिका इमारतीत एकूण सात झुंबरे आहेत. ही सर्व झुंबरे २०२२ मध्ये दुरुस्तीच्या उद्देशाने काढली होती.

Margao Municipality Chandeliers
Goa Crime: मडगाव ज्वेलर्स हत्या प्रकरणात 'ओंकार'ला सहा वर्षांनंतर सशर्त जामीन; खटल्याच्या विलंबाचा आरोपीला फायदा

तीन झुंबरांची दुरुस्ती पूर्ण झाली होती. मात्र, उर्वरित चार  झुंबरांचे सुटे भाग उपलब्ध नसल्यामुळे त्यांची दुरुस्ती करणे शक्य झाले नव्हते. ही सर्व झुंबरे पालिकेच्याच ताब्यात आणि पालिका इमारतीतच सुरक्षित असल्याचे कोठवाळे यांनी स्पष्ट केले.

पालिकेत अंदाधुंदी 

या विषयावर बोलताना ‘मडगाव पालिका म्हणजे अंदाधुंदी’, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले. या पालिकेत  लूटमार चालली असून त्यावर कुणाचाही वचक राहिलेला नाही. झुंबरप्रश्‍नी ते म्हणाले, की ही बेल्जियम देशातील झुंबरे  आहेत. हा इंडो पोर्तुगीज वारसा आहे. ती अतिशय महागडी आहेतच,  तसेच ती दुर्मिळही आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com