Mission Life Awareness : मिरामार येथील मिशन लाइफ जागृती अभियानाला प्रतिसाद

पर्यावरणस्नेही जीवनशैलीचा उद्देश : 100 छात्रसैनिकांचा सहभाग
Mission Life Awareness
Mission Life AwarenessGomantak Digital Team

Mission Life Awareness : केंद्रीय संचार ब्युरो, गोवा आणि 1 गोवा बटालियन एनसीसी पणजी यांच्या वतीने आज मीरामार समुद्रकिनारी पर्यावरण स्नेही जीवनशैलीसाठीच्या मिशन लाईफ अभियान  या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या  कार्यक्रमाला एनसीसीमधील 100 हून अधिक उत्साही छात्रसैनिक उपस्थित होते.

यावेळी त्यांनी  पर्यावरणाचे रक्षण करतानाच  इतरांना पर्यावरणपूरक सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी बदल घडवून आणण्याची प्रतिज्ञा केली. फीडबॅक फाऊंडेशनचे उपाध्यक्ष बालाजी केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली शाश्वत जीवनशैली विषयी  जागरूकता  सत्र झाले. त्यांनी यावेळी अभियानाची  उद्दिष्टे विशद केली  आणि उज्ज्वल भविष्यासाठी शाश्वत जीवनशैली अंगीकारण्याच्या महत्त्वावर भर दिला.

Mission Life Awareness
Panaji Smart City : समन्वयाचा अभाव आणि स्वार्थी वृत्तीमुळेच ‘स्मार्ट सिटी’त अनागोंदी !

या सत्रानंतर शाश्‍वत जीवनशैली अंगिकारण्याचा संदेश देणाऱ्या पथनाट्याचे छात्रसैनिकांनी सादरीकरण केले. छात्रसैनिक आणि समुद्रकिनाऱ्यावर उपस्थित पर्यटकांमधील संवाद हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते. मिशन लाईफची रचना  किमान एक अब्ज भारतीय आणि जगातील इतर नागरिकांना एकत्रित आणण्याच्या  उद्देशाने झाली आहे.

Mission Life Awareness
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल - डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आजचे भाव

जनजागृतीसाठी  प्रभावी माध्यम

एनसीसी छात्रसैनिकांनी पर्यटकांना समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासंदर्भात आणि शाश्वत जीवन पद्धतींचा अवलंब करणे याविषयी जागरूक केले. हा संवाद या अभियानाचा संदेश देण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या गरजेबद्दल जनजागृती करण्यासाठी  प्रभावी ठरला. यावेळी गोवा बटालियन एनसीसी पणजीचे कमांडिंग ऑफिसर, कर्नल एमकेएस राठोड, पीआयबी गोवाचे उपसंचालक  गौतम कुमार आणि केंद्रीय संचार ब्युरोचे  प्रसिद्धी  अधिकारी,  रियास बाबू या कार्यक्रमाला उपस्थित होते.

Mission Life Awareness
गोवा सरकारचा 'गो ग्रीन'चा नारा, भाडे करारावर घेणार 50 इलेक्ट्रिक वाहने

काय आहे मिशन लाइफ?

1 नोव्हेंबर 2021 रोजी ग्लासगो येथे आयोजित कॉप 26 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरणस्नेही जीवनशैलीसाठी लाईफ ही संकल्पना मांडली. मिशन-मोड, वैज्ञानिक आणि व्यापक कार्यक्रमाद्वारे लाईफच्या  कल्पना आणि ध्येय अंमलात आणणे आणि हवामान बदलासंदर्भात  चर्चेसाठी भारताची वचनबद्धता प्रदर्शित करणे हे मिशन लाईफचे  उद्दिष्ट आहे. भारतात, 2018 पर्यंत ग्राम आणि शहरी स्थानिक संस्थांपैकी 80 टक्के संस्था  पर्यावरणस्नेही  बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com